अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली. राम मंदिरात प्रभू रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता पहिलीच राम नवमी येत आहेत. राम मंदिर ट्रस्टकडून राम मंदिर उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रभू रामाची नगरी पूर्ण सजवण्यात आली आहे. राम नवमीमुळे भाविकांसाठी 19 तास दर्शन सुरु राहणार आहे. पहाटे 3:30 वाजेपासून भक्तांसाठी दर्शन सुरु करण्यात येणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत श्रृंगार, राग-भोग व दर्शन होत राहणार आहे. अयोध्येत राम नवमीनिमित्त लाखो भाविक येणार आहे.

शयन आरती महाप्रसाद

अधिक वाचा  मोदींच्या 4दिवसांत पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात 9सभा ! पुण्यात उद्धव ठाकरेही भाजपचा लगेच समाचार घेणार

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम नवमीच्या तयारी विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राम नवमीला सकाळी मंगला आरती ब्रह्म मुहूर्तावर होईल. पहाटे 3:30 वाजता अभिषेक, श्रृंगार आणि दर्शन सुरु होणार आहे. श्रृंगार आरती सकाळी 5:00 वाजता होईल. रामलल्लाचे दर्शन सुरुच राहणार आहे. भगवान राम यांना भोग लावण्यासाठी अल्प काळ पडदे लावण्यात येतील. रात्री 11:00 वाजेपर्यंत दर्शन सुरु राहणार आहे. त्यानंतर भोग आणि शयन आरती होणार आहे. शयन आरती झाल्यावर मंदिराच्या निकास मार्गावर प्रसाद मिळणार आहे.

अधिक वाचा  ‘मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; प्रचंड गर्दीत मोहोळ यांचा अर्ज दाखल

व्हिआयपी दर्शन 19 एप्रिलपर्यंत बंद

राम नवमीनिमित्त देशभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे व्हिव्हिआयपी आणि व्हिआयपी दर्शन 19 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, श्रृंगार आरती पास आणि शयन आरती पास होणार नाही. 16 आणि 18 एप्रिल रोजी रामलल्लाचे दर्शन सकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. नियमित दर्शनाची वेळ सकाळी 6:30 वाजता श्रृंगार आरती झाल्यावर असते.

सुरक्षा व्यवस्था चोख असणार

राम नवमीमुळे अयोध्यात येणारी गर्दी लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. पोलीस आणि प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.