मेलरियावर प्रभावी ठरणारे हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध घेतल्याने एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आसामच्या गुवहाटी शहरात शनिवारी ही घटना घडली. सध्या करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधा वापर करण्यात येत आहे. हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
हा डॉक्टर अ‍ॅनेस्थेशियामधला तज्ञ होता. आपल्याला करोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून त्याने स्वत:च हे औषध घेतले अशी माहिती सूत्रांनी दिली. या औषधामुळेच त्याला ह्दयविकाराचा झटका आला का? हे स्पष्ट झालेले नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपल्याला सहकाऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये औषध घेतल्यानंतर अस्वस्थतता वाटत असल्याचे त्याने म्हटले होते.
भारतातही इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने करोनाच्या रुग्णांवर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरायला परवानगी दिली आहेत. ज्या डॉक्टरने हे औषध घेतले तो करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करत नव्हता तसेच आसाममध्ये अजून एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. COVID-19 मधून बरे होण्यासाठी किंवा रोखण्यासाठी तुम्ही हे औषध स्वत:हून घेऊ नका असा ICMR कडून आधीच इशारा देण्यात आला आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १२०० च्या पुढे गेली होती. देशातील फक्त सहा राज्यांमध्ये अद्यापर्यंत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

अधिक वाचा  ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, कुणा-कुणाला संधी?