लोकसभा निवडणूक 2024 साठी उद्या (7 मे) संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. देशात एकूण 94 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात नेमके कोण-कोण उमेदवार आहेत.

रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आता याच मतदारसंघात कोणकोणते महत्त्वाचे उमेदवार हे रिंगणार आहेत हे आपण पाहूयात.

अधिक वाचा  शांतता रॅली अगोदर खासदार चव्हाण, भुमरे अन् जरांगेंची बंद दाराआड चर्चा; शिष्टमंडळ की रणनिती साशंकता वाढली

तिसरा टप्पा – 11 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

1. रायगड

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- सुनील तटकरे

शिवसेना (ठाकरे) – अनंत गीते

वंचित – कुमुदिनी चव्हाण

2. बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस – सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) – सुप्रिया सुळे

3. धाराशिव

भाजप – अर्चना पाटील

शिवसेना (ठाकरे) – ओमराजे निंबाळकर

वंचित – भाऊसाहेब आंधळकर

4. लातूर 

भाजप – सुधाकर श्रृंगारे

काँग्रेस – शिवाजीराव कलगे

वंचित – नरसिंहराव उदगीरकर

5. सोलापूर 

भाजप – राम सातपुते

काँग्रेस – प्रणिती शिंदे

6. माढा 

भाजप – रणजितसिंह नाईक निंबाळकर

अधिक वाचा  कुठल्याही परिस्थितीत हडपसर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षालाच मिळावी या एकमुखी मागणीसाठी मेळावा संपन्न 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) – धैर्यशील मोहिते पाटील

वंचित – रमेश बारसकर

7. सांगली 

भाजप – संजय काका पाटील (विद्यमान)

शिवसेना (ठाकरे) – चंद्रहार पाटील

अपक्ष – विशाल पाटील (वंचित पाठिंबा)

ओबीसी स्वतंत्र पक्ष – प्रकाश शेंडगे

8. सातारा 

भाजप – उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – शशिकांत शिंदे

वंचित – प्रशांत कदम

अपक्ष – अभिजीत बिचुकले

9. रत्नागिरी सिंधुदुर्ग 

भाजप – नारायण राणे

शिवसेना (ठाकरे) – विनायक राऊत

वंचित – मारोती काका जोशी

10. कोल्हापूर 

शिवसेना (शिंदे ) – संजय मंडलिक (विद्यमान)

अधिक वाचा  बुलडाण्यामध्ये खळबळजनक घटना; अधिकाऱ्यासमोरच महिलेचे थेट हातावर ब्लेडने सपासप वार असं काय घडलं?

काँग्रेस – शाहू महाराज छत्रपती

11. हातकणंगले

शिवसेना (शिंदे) – धैर्यशील माने

शिवसेना (ठाकरे) – सत्यजित पाटील

स्वाभिमानी – राजू शेट्टी

वंचित – दादासाहेब चवगौंडा पाटील