संगमनेर : जगभरात कोरोनाचं संकट आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. कोरोनाच्या संकाटात गरीबांच्या मदतीसाठी किर्तनकार निवृत्ती देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज यांनी १ लाखांची मदत केली आहे. संगमनेरचे तहसीसदार अमोल निकम यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्त केला आहे. इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनामुळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. इंदुरीकर महाराज यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. २२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी त्यांनी, ‘मी घरीच राहणार आहे, तुम्हीही घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं होतं.’
‘आपलं गाव, आपलं शहर, आपला देश कोरोना मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचं आहे. हा लढा कोणाही एकट्या दुकट्याचा आणि निव्वळ शासन प्रशासनाचा नाही, तर सर्वांचा लढा आहे. तेव्हा खबरदारी घ्या. सुचनांचे कोटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने स्वतःसह आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या. शासनाला सहकार्य करा.’ असंही इंदुरीकरांनी आवाहन केलं.

अधिक वाचा  महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या ‘या’ अति महत्वकांक्षी मागणीमुळे पवार अन् ठाकरेही झाले नाराज?