पुणे लोकसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रचाररथ प्रभाग 13मध्ये आल्यानंतर मंदार बलकवडे यांच्या वतीने स्थानिक नागरिकांसह उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या साह्याने भव्य पुष्पहार अर्पण केल्यानंतर फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने एक चांगला कार्यकर्ता ते राज्य सरचिटणीस अशी वाटचाल केलेल्या व्यक्तिमत्वास संधी देऊन एक चांगला संदेश देण्याचं काम केलं आहे त्यामुळे कोथरूड भागातील सर्वाधिक मताधिक्य प्रभाग 13मधून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. स्थानिक नागरिकांकडून उमेदवाराचे उत्साही स्वागत केले जात असून त्यांना मतांमध्येही प्रतिसाद ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत असे भाजपा पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  पहिल्यांदाच उर्फी जावेदच्या ड्रेसचं प्रचंड कौतुक; जादुई ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले ‘खरंच सुंदर ड्रेस!’

ळी सुरेखा होले, अविनाश पुरंदरे, ॲड. रामराव देशमुख, प्रशांत होले, मनोहर कदम, फनेंद्र शेठ, समीर बलकवडे, रूपेश आटक, मंगेश मते, कुंदन तळेकर, रवि अठवले, सतिश दिघे, रूपेश मोगल,आकाश शेडगे, विशाल तांगडे, नितीन जयसिंगपुरे, सुरेश जपे, अनुज मुळीक, अक्षय विनेरकर, अतुल पाठारे, किरण हरगणे, विशाल खसासे, निलेश घाणेकर , आनंद कोळेकर उपस्थित होते.