भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी कोथरूड शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेले अन् मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे जुने सहकारी कोथरूड शिवसेना संघटक नितीन शिंदे यांनी आज उच्च शिक्षणं व तंत्रज्ञान मंत्री पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते त्यांचे महा विजय रथामध्ये स्वागत करण्यात आले.

नितीन शिंदे यांनी मुळातच सामाजिक सेवेचा वसा हा जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारेतून घेतला होता. मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर त्यांनी सामाजिक व राजकीय वाटचालीला शुभारंभ केला होता अन् 1993 पासून पौडरस्ता परिसरातील जय भवानीनगर किषकिंधानगर केळेवाडी आणि सुतारदरा भागामध्ये भाजपाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर राहिल्यामुळे त्यांना वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, युवा मोर्चा कोथरूड अध्यक्ष, युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष आणि भाजपा कडूनच स्विकृत सभासद पदही मिळाले काही वैचारिक कारणास्तव त्यांनी पक्षाच्या कार्यकारणी पदाचा राजीनामा देऊन अन्य पक्षात काम केले परंतु मुळात जनसंघाची घडण आणि आज आपला नेता (जिवलग मित्र) पुणे शहरातील महत्त्वाची निवडणूक लढत असताना त्यांच्याबरोबर राहणं या भूमिकेतून नितीन शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  रावसाहेब दानवे अन् अर्जुन खोतकर एकाच कार्यक्रमात, पण एकमेकांशी… ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नितीन शिंदे यांची मुळातच ओळख ही मुरलीधर मोहोळ यांचे विश्वासू सहकारी म्हणून होती. काही वैचारिक मतभेदामुळे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना काम करणे शक्य झाले नाही तरीही त्यांनी कधीही आपली व्यक्तिगत मैत्री पक्षांतरानंतरही कमी होऊ दिली नाही. भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेच्या वतीने ही कायम जनसंपर्कात राहत एक ‘सक्रिय कार्यकर्ता’ ही आपली भूमिका कायमच जपत जनसेवेत आपलं महत्त्व आबादीत ठेवण्याचं काम केलं. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही नितीन शिंदे यांच्यासाठी एक नवी पर्वणी असून प्रभाग 11 मध्ये भारतीय जनता पक्षाचे व्यक्तिगत लक्ष घालून काम करण्यासाठी नितीन शिंदे यांच्या रूपाने एक हक्काचा आणि आण्णांच्या घरातील माणूस पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कोथरुड कार्यकारणीसाठी ही संजीवनीच ठरणार आहे.

अधिक वाचा  रायगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, तरी ‘योद्धा’ थांबलाच नाही घेतला हा निर्णय

सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुळे यांच्या प्रेरणेने आजपर्यंत कायम जनसेवेत राहत आयुष्य अर्पण केले आहे. काही वैचारिक मतभेदामुळे भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विचारधारेपासून काही काळ दुरावलो असलो तरी ‘जनसेवा हीच खरी सेवा’ या हेतूने शिवसेनेतही पुणे शहर समन्वयक आणि कोथरूड संघटक म्हणून काम चालू होते. पहिल्यापासून जनसंघाचे आणि भाजप काम करत असल्याने त्याच विचारधारेत पुन्हा सक्रिय होण्याचा निश्चय केल्यामुळे आज भाजपा प्रवेश केला असून आपल्या भागात जास्तीत जास्त भाजपाला मताधिक्य देण्याचे काम करणार असल्याचेही नितीन शिंदे यांनी न्यूजमेकर.लाईव्हशी संवाद साधताना सांगितले.