पनवेल दि. १ (अधिराज्य) बौद्धजन सहकारी संघाचे विश्वस्त तसेच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते के. सी. जाधव यांच्या सुविद्य पत्नी तसेच पनवेल विभागातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या कल्पना काशिराम जाधव यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत कल्पना काशिराम जाधव या सोज्वळ, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या, त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग होता, विभागातील प्रत्येक कार्यक्रमात त्या पुढे असत, आंबेडकरी परिवाराच्या एकनिष्ठ अश्या शिलेदार होत्या, त्यांच्यामागे त्यांचे पती, दोन सुपुत्र व नातवंडे असा परिवार आहेत. कोरोना महामारीशी झुंज देत असताना त्यांना अकाली मृत्यू आला त्यांना जाऊन आज ३ वर्षे झाली असली तरी प्रत्येकाच्या स्मृतीत त्या आजही जिवंत आहेत, त्यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाचे आयोजन दि. १ मे रोजी सायंकाळी ७:०० वाजता पनवेल येथे त्यांच्या राहत्या घरी स्थानिक शाखेच्या अधिपत्याखाली करण्यात येणार असून सर्वांनी सदर प्रसंगी उपस्थित राहून दिवंगत कल्पना काशिराम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती अजय जाधव यांनी संस्थेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.

अधिक वाचा  अजित पवारांचा हा ‘विक्रम’ कोणीच मोडू शकणार नाही; अजितदादांनीच केली आठवण; ही दुसरी दुखरी बाजूही