मुंढर: सध्या सरकारने खाजगीकरणाचे धोरण अवलंबले असल्याने सर्वच क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा सुरू आहे अश्या परिस्थितीत तरुणाईला बेकारी व बेरोजगारीच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे तरुणांना आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे याच धर्तीवर कोकणातील गुहागर तालुक्यातील मुंढर गावचे होतकरू सुपुत्र भूषण संजय पवार आणि त्यांच्या पत्नी वैशाली भूषण पवार यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी लघुउद्योग क्षेत्रात पाऊल वळवले, भूषण पवार हे पूर्वीपासूनच मेहनती व उद्योग क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सर्वप्रथम शृंगाळतळी येथे फ्रीज, एसी, कुलर रीपेअरिंगचे काम सुरू केले परंतु या व्यवसायास जोड व्यवसाय म्हणून त्यांनी सपत्नीक शासकीय लघुउद्योग प्रशिक्षणाचा लाभ घेत त्यांनी आराध्य होमफुड प्रोडक्टची मुहुर्तमेढ रोवली त्याअंतर्गत त्यांनी लाडू, सर्व प्रकारच्या चिक्क्या, भाकरवडी, कचोरी, चिवडा,पापडी, चकली, शंकरपाळी, शेव इत्यादी घरगुती सुगरण व चविष्ट पदार्थांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा  फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार: मोहित कंबोज

सदर प्रॉडक्ट्सना मार्केटमध्ये उतरवण्यासाठी भूषण पवार यांनी स्वतःची मार्केटिंग स्ट्रॅटजी विकसित करत तालुक्यातील सर्वच होलसेल व किरकोळ दुकानदारांना स्वतः भेटून कारखानदार व दुकानदार यातील दलाल व्यवस्था मोडीत काढत मार्केटिंगचे मोठे जाळे निर्माण केले व त्यातून दलालांकरवी कमिशनच्या नावावर लुटल्या जाणाऱ्या भरमसाठ रकमेची बचत करत वाजवी दरात दुकानदार व ग्राहकांस आपले प्रॉडक्ट्स थेट उपलब्ध करून दिले.

सदर आराध्य होमफुडच्या उत्पादन यादी (Catlogue launch programme) अनावरण सोहळा नुकताच पाटपन्हाळे आर्टस्, कॉमर्स, सायन्स सिनियर कॉलेजचे प्रोफेसर लंकेश गजभिये, रॉयल गारमेंट्स शृंगाळतळीचे मालक रहीम धामसकर, नाज टेलर्सचे मालक इनायत सिद्धीकी, बौध्दजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मुंढर गाव शाखा अध्यक्ष दर्शन गमरे, उपाध्यक्ष राहुल सुर्वे, सचिव राजेश मोहिते, बौद्धाचार्य राकेश मोहिते आणि रमाई महिला मंडळाच्या आजी-माजी कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीत पार पडला, सदर प्रसंगी सर्वांनी भूषण संजय पवार व वैशाली भूषण पवार या उभयतांचे कौतुक करून त्यांच्या उज्वल भविष्याच्या मंगल कामना दिल्या अश्या प्रकारे सदर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.