नवी दिल्ली: जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या प्रंचड आहे. भारत सरकारनं देशामध्ये अशा साईटसवर बंदी घातलेली आहे. 2019 मध्ये जगातील एका प्रमुख पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांची एका दिवसांची संख्या 115 दशलक्ष होती. मात्र, पॉर्न पाहणं व्यसन आहे का? अनेकांना पॉर्न पाहणं हे व्यसन असल्यासारखं वाटतं. मानसशास्त्रज्ञांना याविषयी काय वाटतं. मानसशास्त्रज्ञांनी मात्र याविषयी वेगळंच मत नोंदवलं आहे.

पॉर्न पाहणं व्यसन आहे का? शास्त्रज्ञांना काय वाटतं?

अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ या विषयाबद्दल वेगळी मत मांडतात. अमेरिकन सायकोलॉजिकलअसोसिएशननं पॉर्न पाहणं हा ड्रग्ज घेणे किंवा दारु पिणे यासारखं व्यसन नसल्याचं म्हटलं आहे. व्यसन या प्रकारात येणाऱ्या जुगार, दारु, अंमली पदार्थ आणि ऑनलाईन गेमिंग हे जसं व्यसन आहे, त्यासारखं पॉर्न पाहणं व्यसन या प्रकारात गणलं जाऊ शकत नाही, असं निरीक्षण देखील नोंदवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

पॉर्न पाहण्याचा मेंदूवर काय परिणाम होतो?

मानसशास्त्रज्ञ पॉर्न पाहण्याला व्यसन मानत नाहीत, याचं एक कारण म्हणजे पॉर्न पाहताना मेंदूमधील घडणाऱ्या क्रिया आहेत. शास्त्रज्ञ असं मानतात की पॉर्न पाहताना मेंदूतील काही पेशी सक्रीय होतात, ज्या दारू पिल्यानंतर किंवा अंमली पदार्थ घेतल्यानंतर देखील होतात पण त्याला व्यसन मानता येणार नाही.

पॉर्न पाहणं व्यसन नाही तर शास्त्रज्ञांना काय वाटते?

काही मानसशास्त्रज्ञ पॉर्न पाहणे हे व्यसन नसून वेडेपणा, सवयीमुळे होणारं वर्तन म्हणतात. काही व्यक्तींना पॉर्न पाहण्याची सवय जडते त्यामागं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी एकाकीपणा अशा गोष्टी कारणीभूत असतात, असं मत मानसशास्त्रज्ञ नोंदवतात. लैगिंक शिक्षणाचा अभाव हे देखील यामागील कारण असल्याचं म्हटलं जातं. 2020 मधील एपीए या संस्थेचा अहवाल असं सांगतो की लोकांच्या सांस्कृतिक, नैतिक, धार्मिक धारणांमुळे त्यांना कमी प्रमाणात पॉर्न पाहिलं तरी व्यसन असल्याचं वाटतं. पॉर्न पाहणं कधी धोकादायक ठरतं हे निश्चित सागंता येणार नाही, कारण ते व्यक्तिपरत्वे ठरते, असं देखील मत शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा

पॉर्न पाहणं कसं थांबवणार?

मानसशास्त्रज्ञांनी पॉर्न पाहणं कसं थाबवायंचं याविषयी काही मुद्दे मांडले आहेत. पॉर्न पाहिल्यानं तुमच्या आयुष्यावर होणारे नकारात्मक परिणाम समजून घ्यावेत. पॉर्न पाहणं थांबवण्यासाठी नियोजन बनवा. मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवा. काही मानसिक समस्या असल्यास मानसोपचार तज्ञांना भेटा.