भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसंदर्भात कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे या बँकेतून आता सहा महिने पैसे काढता येणार नाही. तसेच बँकेला कर्ज देण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सहकारी बँकेमधील गुंतवणूकदारांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. कारण त्यांना त्यांच्या ठेवी किंवा बचत खात्यातील रक्कम काढता येणार नाही. राज्यातील शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या खराब झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा महिन्यांसाठी निर्बंध

इकोनॉमिक्स टाईमन्स दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयकडून प्रथमच कोणत्या बँकेवर निर्बंध आणले गेले नाही. यापूर्वी यस बँक आणि पीएससी बँकेवर निर्बंध आणले होते. या बँकेतून पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध आणले आहे. आता कोणत्या ग्राहकांना सहा महिने बँकेतून पैसे काढता येणार नाही. परंतु बँकेत असणारी रक्कम सशर्त आपल्या कर्ज खात्यात भरता येणार आहे.

अधिक वाचा  महायुतीमध्ये काहीतरी गडबड? महाराष्ट्रात एकीकडे मोदी मैदानात उतरले तरी महायुतीचा ‘या’ जागीचा खल सुरुच

गुंतवणूकदारांपुढे काय पर्याय

आरबीआयने म्हटले आहे की, आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम किंवा नूतनीकरण करणार नाही. तसेच कोणीही गुंतवणूक करणार नाही. यामुळे शिरपूर मर्चेंट्स को-ऑपरेटिव बँकेच्या ग्राहकांपुढे आता काय पर्याय आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांना पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.