मुंबई : क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणातील पंच आणि साक्षीदार (kiran gosavi) याची अटक अटळ असल्याचे सांगण्यात आले आहे. किरण गोसावी (kiran gosavi) हा महाराष्ट्राबाहेर असून तो सध्या उत्तर प्रदेशात असल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. आता किरण गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (kiran gosavi audio clip) होत आहे. आपल्याला सरेंडर करायचं आहे, असं किरण गोसावी लखनऊ पोलिसांना या व्हायरल ऑडिओ क्लिकपमध्ये म्हणतोय. तर पोलिस अधिकारी त्याला सरेंडर करून घेण्यास स्पष्टपणे नकार देत असल्याचं ऐकायला येतंय. गोसावी लखनऊमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं (pune police) पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे.

अधिक वाचा  मुलांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना वाढतोय का?

लखनऊ पोलिसांचा सरेंडर होण्याचा सल्ला

पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं आहे. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे. फसवणूकप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावी याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनऊ पोलिसांकडे गेला समजत होतं. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याच समजतेय. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनऊ लखनऊ पोलिसांनी दिला.

किरण गोसावीची २५ कोटींची डील?

अधिक वाचा  पतित पावनची 'देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती' तून श्रध्दांजली

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. या प्रकरणी आर्यन खान हा तुरुंगात आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी किरण गोसावीने शाहरुक खानची मॅनेजर पूजाशी कोट्यवधींची डील केल्याचा आरोप या प्रकरणाती साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. किरण गोसावीची २५ कोटींची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असाही आरोप प्रभाकर साईलने केलाय. यामुळे आरोपांनंतर किरण गोसावी महाराष्ट्राबाहेर आहे. आर्यन खानसोबतचे किरण गोसावीचा फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, आर्यनच्या सांगण्यावरूनच आपण शाहरुखच्या मॅनेजरला फोन लावला होता, असं किरण गोसावीचं म्हणणं आहे.

अधिक वाचा  देशाचा गरिबी अहवाल : बिहारमध्ये सर्वाधिक ५१ टक्के, तर सर्वात कमी कुठे? महाराष्ट्रही २ अंकी?