मुंबई : आपसांत मोठी रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ठाण्याची जागा शिंदेसेनेला की भाजपला, हा फैसला अजूनही होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या पक्षाला मिळावी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, कल्याण आणि नाशिक या पाच लोकसभा जागांबाबतचा महायुतीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे; मात्र ठाण्यासह अन्य जागांचा निर्णय होत नसल्याने कल्याणमधील जागेचे घोडेही अडले आहे.

सध्याचे खासदार हेमंत गोडसे उमेदवारी नक्की असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटानेही या जागेवरील आग्रह सोडलेला नाही. पालघरमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेसेनेचे आहेत; पण ही जागा शिंदेसेनेकडेच राहणार की भाजपकडे जाणार हे अद्याप ठरू शकलेले नाही. दक्षिण मुंबईसाठीचा आग्रह शिंदेसेनेने अद्याप सोडलेला नाही; पण भाजपला ही जागा हवी आहे. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.

अधिक वाचा  ‘उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज’; फडणवीसांची जहरी टीका

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेली, औरंगाबादची शिंदेसेनेकडे गेली; पण पाच जागा अजूनही अडकल्या आहेत. आघाडीने तिथे आधीच उमेदवार जाहीर केले आहेत.