भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू आहे. पहिले दोन सामने मोठ्या फरकाने आपल्या खिशात टाकून भारतीय संघाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची होती. भारताने चांगला खेळ करून आपण फायनलमध्ये पोहचण्याचे खरे दावेदार आहोत हे दाखवून दिलंय.

दरम्यान, पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. एकेकाळी फानलमध्ये पोहचण्याचा प्रबळ दावेदार मानला जाणारा संघ भारताच्या दोन विजयामुळे बाहेर झाला आहे. इतकंच नाही तर, ऑस्ट्रेलियावरही स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या विजयानंतर भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पात्र होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

अधिक वाचा  रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले “आता कळेल…आता ते पुन्हा स्वगृही”

पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे, तर भारताने दिल्ली कसोटीत विजय मिळवून स्वतःमधील आणि तिसऱ्या स्थानावरील संघातील अंतर वाढवले आहे. भारताने दिल्लीतील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर अंतिम फेरीच्या शर्यतीतील संघ चारवरून आता तीनवर आले आहेत. त्यामुळे एकेकाळी स्पर्धेत बलाढ्य मानला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या टक्केवारीपासून तो खूपच लांब गेला आहे. आता टॉप-२ मध्ये जागा मिळवण्यासाठी फक्त श्रीलंकेचा संघ भारताला आव्हान देऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाही सुद्धा बाहेर जाणार
पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण त्यांचं अंतिम फेरीचं तिकीट निश्चित झालं आहे, असं म्हणता येणार नाही. कारण, भारताने जर ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलियावर मोठं संकट नक्कीच येऊ शकतं. गुणतालिकेत त्यांचे पॉईंट्स कमी होत ते खाली घसरू शकतात आणि त्यांना अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी श्रीलंका-न्यूझीलंड मधील कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकेने जर ही कसोटी एकतर्फी जिंकली तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीच्या रेसमधून बाहेर जाईल. तर सोबतच अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत होईल.

अधिक वाचा  वाढवण बंदर खडक रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनास अनुकूल विरोध पेटला, स्थानिक सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबल स्थिती
ऑस्ट्रेलिया, विजयाची टक्केवारी – ६६.६७%
भारत, विजयाची टक्केवारी – ६४.०६%
श्रीलंका, विजयाची टक्केवारी – ५५.३३%
दक्षिण आफ्रिका, विजयाची टक्केवारी – ४८.७२%
इंग्लंड, विजयाची टक्केवारी -४६.९७%