IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स जिथे-जिथे खेळतेय, तिथे-तिथे हार्दिक पांड्याला क्रिकेट फॅन्सच्या रागाचा, विरोधाचा सामना करावा लागतोय. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या मनात फक्त हार्दिक बद्दल अपमानाची भावना दिसतेय. मुंबई इंडियन्सच होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवरही प्रेक्षकांना हार्दिक पसंत नाहीय, हेच दिसलय. 11 एप्रिलला वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा RCB विरुद्ध सामना झाला. त्यावेळी सुद्धा हार्दिक पांड्याच्या बाबतीत हेच दिसून आलं. कालच्या सामन्यात मैदानात विराट कोहलीने जी कृती केली, तस अजूनपर्यंत रोहित शर्माकडून दिसलेलं नाही. विराट मुंबईच्या फॅन्ससमोर हार्दिकसाठी ठामपणे उभा राहिला.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच कॅप्टन बनवणं चाहत्यांना पटलेलं नाही. ते हार्दिकवरच्या रागा मागच खरं कारण आहे. रोहितचे कट्टर चाहते अजूनपर्यंत हे पचवू शकलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते हार्दिक पांड्याचा विरोध करत असतात. त्यामुळे मुंबई इंडियन्सच होम ग्राऊंड वानखेडेवर सुद्धा हार्दिकला अन्य मैदानांप्रमाणे फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला.

अधिक वाचा  … आता एआय करणार सगळं काम! पुण्यातील तरुणांनी उभारलं ‘अमेझॉन-गो’ स्टाईलचं 24×7 ग्रोसरी स्टोअर

विराटचा व्हिडिओ व्हायरल

RCB विरुद्ध सामन्या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनचा वानखेडेवरील प्रेक्षकांनी अपमान केला, ते विराट कोहलीला पहावल नाही. बाऊंड्री लाइनवर फिल्डिंग करणारा विराट हार्दिक पांड्यासाठी ठामपणे उभा राहिला. त्याने ठोस भूमिका घेतली. तुम्ही अशा प्रकारे हार्दिकचा अपमान करु नका, असं त्याने प्रेक्षकांना सांगितलं. हार्दिक भारताचाच खेळाडू आहे. अपमान करण्याऐवजी त्याच्यासाठी चिअर करा असं विराटने अपमान करणाऱ्या फॅन्सना सांगितलं. विराट कोहली प्रेक्षकांना हे सांगतोय, तो व्हिडिओ व्हायरल झालाय.

हार्दिकची 350 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग

मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरु असताना विराट हार्दिकसाठी बोलला, हे व्हिडिओमध्ये दिसतय. मॅचबद्दल बोलायच झाल्यास मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने RCB विरुद्ध हा सामना 27 चेंडू आणि 7 विकेट राखून जिंकला. यात विनिंग रन हार्दिक पांड्याच्या बॅटमधून निघाला. हार्दिक पांड्याने 16 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सिक्स मारुन मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. हार्दिकने 350 च्या स्ट्राइक रेटने 3 सिक्सच्या मदतीने 6 चेंडूत 21 धावा केल्या.