सिंधुदुर्ग : भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर शाहांनी जोरदार हल्ला केला आहे. महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार तयार झाल्याचं ते म्हणाले. तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला असल्याचं म्हणत शाहंनी हल्लाबोल केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचा प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीमध्ये वाहू देत ही सत्ता स्थापन करण्यात आल्याचं म्हणज शाहंनी शिवसेनेवर तोफ डागली. दाराआड शिवसेनेसोबत कधीच चर्चा झाली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. ‘मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, आपण जो जनादेश दिला होता त्याचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी, जनादेशाविरोधात हे सरकार आलं आहे.

अधिक वाचा  मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे ‘अग्निपथ’, ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं

जनादेश होता की पंतप्रधान मोदी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्त्वाखाली इथं भाजप आणि शिवसेनेचं सरकार व्हावं. पण, ते म्हणतात की आम्ही वचन मोडलं. आम्ही तर वचनं पाळणारी माणसं आहोत, असं खोटं कधीही बोलत नाही’, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी परराज्यांतील युती सरकारची उदाहरणंही दिली.

नारायण राणे ‘दबंग नेता’ : देवेंद्र फडणवीस

अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय.

अधिक वाचा  मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका

पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.