पुणे : कोरोना अजून संपला नाही. पहिली, दुसरी आणि अत्ता तिसरी लाट येत आहे.यावर अजूनही औषध नाही,कोरोना लस हाच यावरचा सद्यस्थितीत प्रभावी उपाय आहे.प्रत्येक नागरिकांने आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून संपुर्ण देशात मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे.आपल्या आरोग्याची काळजी आपण घ्यावी,नाहीतर कोरोनाचा कहर आपण अनुभवला आहे, तो भोगण्याची वेळ कोणावरही येऊ नये.कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आरोग्यसंपन्न जीवन जगावे यासाठी अटल आरोग्य रथ आपल्या दारी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर घेऊन आलो आहे अशी माहिती पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष तथा अटल आरोग्य रथ संकल्पक राहुल दादा शेवाळे यांनी दिली.

अधिक वाचा  पाणी कपातीचा विचार नाही; उलट फडणवीसांच्या काळातच पाणी कपात झाली!

हवेली तालुक्यातील उरूळी देवाची,होळकरवाडी या गावात अटल आरोग्य रथ आल्यानंतर मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीराचे उद्घाटन आणि स्वागत
जेष्ठ नेते योगगुरू अनंतअप्पा झांबरे आणि
सरपंच प्रज्ञाताई झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हवेली भाजपा अध्यक्ष धनंजय कामठे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन हांडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सुरज बिरे, राजेंद्र शेवाळे, किरणजी झांबरे, दत्तात्रय खोटे, विश्वास आबा झांबरे,दत्ताजी होळकर, अमोलजी औताडे, जेष्ठ नागरिक मारुती थिटे आदी उपस्थित होते.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या अटल आरोग्य रथ या उपक्रमास पुरंदर प्रमाणे हवेली तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरोना काळात त्यांनी सुरू केलेला हा अटल रथ सर्वांचे आरोग्य सुदृढ करणार आहे.आरोग्यदुत च्या भूमिकेत कायमस्वरूपी या पुढेही अशाच सामाजीक जाणिवेतून नागरिकांची आरोग्य सेवा करत रहावी अशा शुभेच्छा जेष्ठ नेते योगगुरू अनंतअप्पा झांबरे दिल्या.होळकरवाडी परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीरचा लाभ घेतला.