मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात पोहोचली असून आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. अंदाजे साडेतीन लाख मराठे पदयात्रेत सहभागी झाले आहेत. आज पदयात्रेचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची यात्रा औंध मार्ग राजीव गांधी पूलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे. दरम्यान लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळला जावा, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?,अशी चर्चा निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांनी कागदपत्रांची पडताळणी करावी, असे दीपक केसरकर म्हणाले. मनोज जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होत की आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना जर रस्त्यार सरकारने काही निर्णय घेतला तर आम्ही तिथंच गुलाल उधळू, आता दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे सरकार काही निर्णय घेणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  मावळ लोकसभेत प्रचारासाठी सुपरस्टार गोविंदा आला खरा, पण उमेदवाराचं नाव विसरून त्यानं बल्ल्या केला

मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांनी नोटीस देण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. यावर केसरकर म्हणाले,  प्रत्येक सरकारची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था टिकवणे आहे. म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते. मराठा समाजाला दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. जो अर्ज करेल त्याला दाखल देण्यात येत आहेत. सरकार मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. सरकार सकारात्मक आहे. समाजाला अपील करतो की मागण्या तर पूर्ण झाल्या आहेत. त्यांना दाखले देखील मिळत आहेत. ते दाखले तुम्हाला गावातच मिळणार आहेत. त्यासाठी मुंबईत येण्याची गरज नाही, असे केसरकर म्हणाले.