पुणे (प्रतिनिधी) : कोंढवा पोलीस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका इसमाच्या तोडावर व मारहाण करुन, गळा आवळुन खुन करुन बॉडी फेकुन देण्यात आली होती. खुन करणा-या अज्ञात इसमाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके रवाना करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अंमलदार यांच्यासह अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते.

कोणतेही ओळखपत्र तसेच अंगावर गोदलेले नसलेली एक बॉडी हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जनस्थळी तपासंती मिळाली. मयताचे कपडे तपासले असता त्यामध्ये देखील कोणतेही टेलर मार्क दिसुन न आल्याने मयताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसाच्या समोर होते. तसेच घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे सीसीटिव्हि फुटेज, प्रत्याक्षदर्शी साक्षीदार अथवा तांत्रीक परिस्थितीजन्य पुरावा प्रथमदर्शनी नसतानाही कोंढवा पोलीसानी आव्हानात्मक कामगिरी करून मयत नसीम सइदुल्लाह खान, वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश यांची असल्याची माहिती निष्पन्न केली.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांचे प्रभाग 13मध्ये जंगी स्वागत; स्थानिक नागरिकांची उत्साही गर्दी

मयत नसीम सइदुल्लाह खान याचा कोणाशी वाद आहे का? कोणाशी भांडणे झाली आहे का? याबाबत तपास केला असता चौकशी दरम्यान घटनास्थळाजवळील वस्तीमध्ये राहणारा कमल रोहित ध्रुव, वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. छत्तीसगड यांच्यावर संशय बळवल्याने ताब्यात घेतले. पहिल्यादा उडवाउडवीची उत्तरे देणारा कमल रोहित ध्रुव यास पोलीसी खाक्या दाखवुन तसेच भावनिक प्रश्न विचारुन चौकशी केली असता रोजच्या दारू पिऊन शिविगाळीस कंटाळून कमल रोहित ध्रुव याने नसीम सइदुल्लाह खान याच्या पाठोपाठ जावुन प्रथम हाताने गळा आवळुन व नंतर तोडावर दगड मारुन जखमी करुन खुन केल्याची कबुली दिली.

अधिक वाचा  महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; महिलांची विशेष उपस्थिती अन् प्रचंड उत्साह

यावेळी पोलीस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभागरंजन शर्मा,पोलीस उप आयुक्त सो परि.०५ आर राजा, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो.हवा. अमोल हिरवे, पो हवा विशाल मेमाणे, पो हवा लवेश शिंदे, पो हवा निलेश देसाई, पो हवा सतीश चव्हाण, पो शि शाहिद शेख, पो शि संतोष बनसुडे, पो.शि. जयदेव भोसले, पो.शि. विकास मरगळे, पो.शि. शशांक खाडे, पो. शि. रोहित पाटील, पो. शि. राहुल थोरात, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो.शि. आशिष गरुड, पो.हवा. राहुल वंजारी, पो.शि. सुहास मोरे, पो शि सुरज शुक्ला पो शि लक्ष्मण होळकर, पो शि ज्ञानेश्वर भोसले यांनी अवघ्या आठ तासात अव्हानात्मक सुपरफास्ट कामगिरी पुर्ण केली.