तो आला, त्यानं पाहिलं अन् त्यानं जिंकलंही. पण तो नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला. हे घडलं ते सुपरस्टार गोविंदा सोबत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी (5 मे 2024) मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या प्रचारानिमित्त रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी तो आला. त्या श्रीरंग बारणेंचं नाव घेणं तो विसरलास. शेवटी शेजारी बसलेल्या भाजप आमदारानं त्यांना आठवण करुन दिली. हा सर्व प्रसंग माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वत्र चर्चांना उधाण आलं.

अधिक वाचा  अजबच! काँग्रेसचा आमदार भाजपच्या मंत्रिमंडळात सामील आणि शपथविधीही पार

महायुतीचे स्टार प्रचारक सुपस्टार गोविंदा सध्या महायुतीचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. रविवारी श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी गोविंदा मावळमध्ये उपस्थित होते. पण ज्यांच्या रोड शोसाठी गोविंदा मावळमध्ये आला, त्या श्रीरंग बारणेंचं नाव शेजारी बसलेल्या भाजपच्या आमदार उमा खापरेंना सांगावं लागलं. हे सगळं माध्यमांच्या कॅमेरात कैद झालं. आता ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गोविंदा मावळमध्ये आला, त्या उमेदवाराचं नावंच लक्षात नसेल, तर गोविंदाला बोलावून काय साध्य झालं? असा प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चेत होताच. पण हाच प्रश्न गोविंदाच्या उजव्या बाजूला बसलेल्या मावळ लोकसभेतून महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या श्रीरंग बारणेंना नक्कीच पडला असेल.

अधिक वाचा  देवेंद्र फडवीसांमध्ये पोटेन्शिअल होतं पण धावपळ पुर्णपणे वेगळीच! दिल्लीत जायचंय…?; शरद पवारांचं मोठं विधान

स्टार प्रचारक असूनही उमेदवाराच्या नावाचा विसर

मुळात गोविंदाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत उमेदवारीही जाहीर केल्याचं बोललं जात होतं. पण अखेर महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून त्याचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. शिवाय स्टार प्रचारक म्हणून शिंदेंची शिवसेना गोविंदाचे राज्यभर दौरेही लावत आहे. पण सेलिब्रिटी असणारे गोविंदाला राजकारणात किती रस आहे, हे त्यांच्या मावळमधील कृतीनं दिसून आलं आहे. तशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. असंच इतर लोकसभा मतदारसंघातही घडलं तर आपल्या प्रचारात गोविंदा नको रे बाबा, असं म्हणायची वेळ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांवर नक्की येऊ शकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अधिक वाचा  महाराष्ट्रात मान्सूनचे धुमशान; पुण्यात रेड अलर्ट या शाळांना सुट्टी पण मुख्याध्यापकांसह इतरांना ‘ही’ ड्युटी

बारणेंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनही गोविंदाच्या हस्ते

बारणेंच्या पिंपरी चिंचवड मधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे नावचं गोविंदाला माहीत नसल्याचे समोर आले.