पुणे : कोणतेही संघटनात्मक अथवा लोकपयोगी काम पुणे शहरात नसतानाही अगदी शेवटच्या टप्प्यात असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणात कायम ‘बी टीम’ म्हणून वेगळी व्याख्या होत असताना ‘एआयएमआयएम’ पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार अशी कोणतीही निवडणूक पूर्व सभा किंवा जनतेशी संवाद साधला नव्हता. कोणत्याही प्रकारची रणनीती, लोकउपयोगी उपक्रम न राबविता अचानकपणे उमेदवार देण्यामागचा उद्देश मागील अनेक दिवसातील एमआयएम उमेदवाराने केलेल्या निवडणूक प्रचारातील विविध मुद्दे आणि भूमिकेने मुस्लिम समाज आणि पुणेकर नागरिक जागरूक झाला असल्याने एमआयएम उमेदवार अनिस सुंडके यांची अनामत रक्कम जप्त होऊ शकते असे मत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस महासचिव आय टी तज्ञ सईद आरकाटी यांनी पत्रकार परिषदेत केले.

याविषयी पुढे बोलताना म्हणाले की, ” देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर झाल्यावर पुणे लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. ज्यामध्ये भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळाली आहे. या चार ही उमेदवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. या निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमदेवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करताना आणि आपला विकास आराखडा पुणेकर नागरिकांसमोर मांडत असताना असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाचा उमदेवार मुस्लिम समाजाला भावनिक करून मताचे धूर्विकरण करण्यासाठीच निवडणूक लढवीत आहे की काय? असे मुस्लिम समाजासह पुणेकरांना प्रश्न पडला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाचा अजेंडा हा काँग्रेसला संपवण्यासाठी आणि भाजपला सपोर्ट करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीत उमेदवार देण्याची खेळी खेळत आहे. कारण देशभरात ज्या – ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या सगळ्याच ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. असदुद्दीन ओवैसी हे उमेदवार निवडणुकीत विजयी होण्यासाठी देत नसुन भाजपा ला फायदा करण्यासाठीं उभा करत आहेत हा आजवरचा इतिहास आहे.

अधिक वाचा  कराडच्या समर्थकांचा गोंधळ, घोषणाबाजी; बीडमध्ये पोलिसांकडून ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुणे लोकसभा संदर्भात बोलायचं झाले, तर पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पराभव दिसत असल्याने आणि नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजय होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. एमआयएम या पक्षाला जो समाज मतदान करतो. त्या समाजातील नागरिकांना मागील काही निवडणुकीतील अनुभव पाहिल्यावर समजले आहे की, एमआयएमला मतदान केल्यावर भाजपचा उमेदवार निवडून येतो. आपल्या मतांचे विभाजन होते. त्यामुळे आजवर एमआयएमला जो समाज मतदान करित आला आहे तो यापुढे मतदान करणार नाही. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करेल आणि यंदा मतांचं विभाजन होणार नसल्याचा विश्वास यावेळी सईद आरकाटी यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  भरत गोगावलेंची पाठराखण एकनाथ शिंदेंनी करताच तटकरे म्हणाले, “आम्ही सुसंस्कृत…ही आमची संस्कृती नाही”

तसेच ते पुढे म्हणाले की, उपेक्षित मुस्लिम समाज जागृत झाल्याचे दिसून आल्यानेच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात वक्फ बोर्ड ची जमीन बळकवल्याचा खोटा मुद्दा पुढे आणला. नेमका निवडणूक काळातच वक्फ बोर्डाचा विषय कसा ? यापूर्वी झोपी गेले होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याच उमेदवाराने जातीय तेढ निर्माण व्हावी यासाठी टिपू सुलतान स्मारकाचा भावनिक मुद्दा निर्माण केला. खरे तर एमआयएम उमेदवार अनिस सुंडके

यांच्या रस्ता पेठतील दहा बाय दहा घरापासून आजरोजी असणारे पाचहजार स्क्वेअर फुट मधील आलिशान घर, ऑफिस आणि गोडाऊन कुठल्या जागेत उभा आहे याची पुराव्यानिशी माहिती आणि सद्यस्थिती एका मुस्लिम शिवसेसैनिकाने पुणेकर नागरिकांना सांगितली आहे. ज्या पेन्शनवाला मशीद जागेवर अनधिकृत पणे कब्जा मारला तो कोर्टाचा निकाल विरोधात लागल्यानंतरही ती जागा समाजाला परत केलेली नाही, असा उमेदवार मुस्लिम समाजाच्या भावनेचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करत आहे. हे उपेक्षित मुस्लिम समाज आणि सुज्ञ पुणेकरांच्या लक्षात आले आहे.

अधिक वाचा  अखेर सुनील तटकरेंनी मौन सोडलं; धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी नाकारलं?

एमआयएमला पुणे शहरात बाहेरचा उमेदवार आणावा लागला

राजकीय पक्ष किंवा संघटना असल्यावर काही तरी शहरात काम दिसते. पण मागील दोन वर्षांत अथवा कोरोनाच्या काळात तरी किमान पुणे शहरात एमआयएमचे काही तरी काम दिसले असते. मात्र आता निवडणुका आल्यावर ते उमेदवार आणतात. एमआयएमला पुणे शहरात उमेदवार मिळत नाही. त्यामुळे त्यांना बाहेरचा उमेदवार आणावा लागला आहे. त्यामुळे एमआयएमचा उमेदवार म्हणजे भाजपची बी टीम असल्याचे सांगत त्यांनी एमआयएम पक्षाच्या नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्याचे अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सईद आरकाटी यांनी सांगितले.