मुंबईः औरंगजेब आणि पेशव्यांवरील विधानानंतर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आज मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी एक विधान करुन पुन्हा चर्चा घडवून आणली. भालचंद्र नेमाडे यांचा आज एक कार्यक्रम मुंबईत झाला. अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘अधांतर : भूमी व अवकाश’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या ग्रंथाचे प्रकाशन नेमाडे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना नेमाडे म्हणाले की, माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. यातून कसा मार्ग काढायचा हा एक प्रश्नच आहे. सध्या बकवास सुरु आहे त्यामुळे देश कसा चालतोय, असा प्रश्न पडतोय.

अधिक वाचा  कॉलर सकाळी उडो की संध्याकाळी, कॉलर… उदयनराजे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

पुढे बोलतांना नेमाडे म्हणाले की, अधांतर हा दुर्मिळ ग्रंथ म्हणावा लागेल. कुठे तरी आपल्यात प्रत्येकात एक संस्कृती असते, जी नाटकात दिसते. जगात कॅपिटलीझम वाढलंय त्यामुळे वाटतं की पुढे काय होणार? सगळी कामं रोबोट करत आहे. यंत्र माणसांना संपवणार आहे. कलाकाराला जे कळतं ते भेसूर सूत्र जयंत पवार यांनी लेखात मांडल्याचं नेमाडेंनी सांगितलं.

नेमाडे काय म्हणाले?

प्रत्येकाला आपल्या गावातील लोक जवळचे वाटतात. शहरात असं नाही, बाजूला कोण राहतं, हे आपल्याला पाच-पाच वर्षे कळत नाही. दुरावा वाढत जातो आणि शेवटी सगळं आपल्या घरापर्यंत देखील येतं. हे सगळं अधांतरमध्ये दिसतं.