बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा हायव्होल्टेज सामना रंगला आहे. बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत. त्यामुळे बारामतीत दोन्ही गटाच्या प्रचारसांगता सभा होणार आहेत. त्याआधी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आले आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानं बारामतीत दोन्ही पवारांच्या सभा जोरदार होणार आहेत. बारामतीत यंदा दोन राष्ट्रवादी, दोन सभा आणि दोन पवार, असं चित्र पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार, अशी होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामती मधीन मिशन हायस्कुलच्या मैदानात पार पडत आहे. 50 वर्षांत पहिल्यांदा शरद पवार यांच्या सांगता सभेच मैदान बदललं आहे. दुसरीकडे लेंडी पट्टी येथील मैदानात शरद पवार यांची सभा पडणार आहे.

अधिक वाचा  मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

त्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीत रॅलीचं आयोजन केलं होतं. तेव्हा, नगरपालिकेसमोर दोन्ही गटाच्या रॅली आमने-सामने आल्या. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं.

दरम्यान, बारामतीची निवडणूक पहिल्या दिवसापासून रंगतदार होती. आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी घराणेशाहीवर यंदा बारामतीत प्रचार पार पडला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या सभेचं मैदान अजित पवारांनी आधीच सभेसाठी काबीज केलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेण्यात येत असलेल्या सांगता सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका