संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठीअनेक नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदेमातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच, कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहातअनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे.

राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणारनाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचेफलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे.

अधिक वाचा  ‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार’, PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका

राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केलीआहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.