rain flows down from a roof down

यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मान्सूनमुळे पेरण्या रखडल्यानं बळीराजा चिंतेत आहे. आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही राज्यातील काही भागांत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. नवी मुंबईत पावसाची हजेरी नवी मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आज सकाळी नवी मुंबईत अचानक पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारंबळ उडाली, तर काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

अधिक वाचा  भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला

नागपुरात पाऊस दुसरीकडे विदर्भात देखील पावसाला सुरुवात झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भंडाऱ्यात पावसाची हजेरी भंडारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे, तर नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आज पावसाचं आगमन झालं. हा या वर्षातील पहिलाच पाऊस असल्यानं नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.