पुणे: आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे यांनी 12 मे रोजी आपली नवी दिशा ठरवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे. संभाजीराजे म्हणाले, दोन निर्णय मी घेतले आहेत.

त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जून मध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी, 1 सेना, 1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदललं भाजपला २, काँग्रेसला1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे. मी निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 42 मताचा कोट पूर्ण करावा लागेल, 28 मत शिल्लक आहेत …आता राजकीय पक्षांनी ठरवावं. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा.

अधिक वाचा  सांगलीत काँग्रेसचा ‘बाहुबली’ होतोय, पण ‘कटप्पा’च्या भूमिकेत कोण? हे पोस्टर व्हायरल राजकीय वर्तुळात चर्चा

दुसरी घोषणा अशी की, स्वराज्य नावाची संघटना आपण स्थापन करत आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना एका छता खाली आणायचा प्रयत्न आहे, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, अन्याय होत असेल तिथे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज, शाहु महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं.

कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, गोंदिया जिल्हा सोडला तर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, ओला कोरडा दुष्काळ, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला विनंती केली आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं महणून ते पद स्वीकारलं.

अधिक वाचा  ‘दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा नारी रुप घेते तेव्हा…’, निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची पहिली प्रतिक्रिया

म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांचे आभार. संभाजीराजे म्हणाले, मी मोदींना भेटलो तेव्हाच मी त्यांना पुस्तक दिलं होत आणि त्याच विचाराने मी चालणार हे स्पष्ट केलं त्यामुळे राजकारण विरहित काम केलं, गरज असेल तिथे गेलो. माझा कार्यकाळ समाज हिताच्या दृष्टीने मी केलेले कार्यक्रम… शिवराज्याभिषेक समिती स्थापना करून दिल्लीत व्यापक स्वरूपात साजरी करायला सुरुवात झाली.

शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर सुरुवात केली. राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात सुरू झाला. 25 देशाचे राजदूत आले होते, मी संसदेत शिवाजी शाहू, फुले, आंबेडकर यांचेच विचार मांडले, गडकोट किल्ल्यांसाठी बोललो. मी बोलल्यावर रायगडावर राष्ट्रपती आले.