बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे नेहमीच चर्चेत असतं. कंगणा आणि करण जोहरमध्ये सध्या सोशल मिडियावर शित यूद्ध पहायला मिळत आहे. कंगनानं आधी करण जोहरला डिवचल त्याच कारण ठरली प्रियंका मात्र करण जोहरनेही तिला चांगलच प्रतिउत्तर दिल आता पुन्हा कंगनानं करण जोहरला चाचा चौधरी म्हणतं सुनावल.

कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि चित्रपटामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळेही चर्चेत कारण ठरते. आजही तिच्या भूतकाळातील अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा रंगतात. तिने लवकरच सेटल व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता कंगना तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचे दिसते आहे.

अधिक वाचा  बौद्धजन सहकारी संघाच्या विद्यमाने तथागत गौतम बुद्धांच्या मार्गदर्शनाचा वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन

तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. कंगना कोणाच्या प्रेमात पडली आहे असा प्रश्नही ते विचारत आहे.

कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

36 वर्षीय कंगनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिलंय, ‘कोण आहे जो स्वप्नात आला आहे, तो कोण आहे जो हृदयात शिरला तर काहींनी तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलयं मात्र त्यावेळी काहींनी पुन्हा तिला ऋतिक रोशनची आठवण येत आहे का असं म्हणत टोमणेही मारले आहेत.

अधिक वाचा  राज्य शासन शासकीय सेवेतील 300000 पदे रिक्त!; ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार

2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली होती, ‘ तिला लग्न करायचं आहे आणि मुलं हवी आहे. ती स्वत:ला पाच वर्षांनी आई आणि पत्नी म्हणून पाहते. तिला तिच्या जोडीदाराबद्दल विचारलं असता, “तुम्हाला लवकरच कळेल.” असं ती म्हणाली होती. त्यामुळे आता ती तिच्या स्वप्नाचा राजकुमार कोण आहे याचा खुलासा कधी करते याची उत्सूकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.