केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची महाराष्ट्रात जबाबदारी कुणाकडे असेल? याविषयी सध्या तर्क लावले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत. मागच्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये त्यांची झालेली सभा आणि त्यांनी मांडलेले शेतकऱ्यांचं प्रश्न पाहता महाराष्ट्रात पाय रोवायला ते सज्ज असल्याचं दिसून येत आहे.

नांदेडमध्ये त्यांनी ‘अब कि बार किसान सरकार’ अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं. तर त्यांनी काँग्रेसवरही टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्तापर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.

अधिक वाचा  सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा मोठा कट; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप

केसीआर यांना महाराष्ट्रात पाय रोवायचे असतील तर इथल्या मातीतला नेता त्यांना सोबत घ्यावा लागले. त्यासाठी आघाडीवर असलेलं नाव राजू शेट्टी यांचं आहे. त्यांची भेटही झालेली आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबतही केसीआर यांची भेट झाली. तर प्रकाश आंबेडकर हे तेलंगणा विधानसभेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केसीआर यांना कोण सोबत करणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.