पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारेक फतेह यांचे सोमवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. तारेक फतेह यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. फतेह यांचा पाकिस्तानात जन्म झाला होता. पण ते पाकिस्तानात जन्मला आले असले तरी ते स्वत:ला भारताचे सुपुत्र म्हणत होते.

नवी दिल्ली : पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारिक फतेह यांचे सोमवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. तारिक फतेह यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. फतेह यांचा पाकिस्तानात जन्म झाला होता. पण ते पाकिस्तानात जन्मला आले असले तरी ते स्वत:ला भारताचे सुपुत्र म्हणत होते.

अधिक वाचा  दिल्लीकर चाखणार कोकणातील हापूसची चव, आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

तारिक फतेह हे पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक आणि विचारवंत होते. फतेह यांचे संपूर्ण कुटुंब फाळणीपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. मात्र, 1947 च्या फाळणीत त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले होते. ही त्यांची चूक होती. पाकिस्तानात गेल्यानंतर दोन वर्षांनी 20 नोव्हेंबर 1949 रोजी तारिक यांचा जन्म झाला. पण, काही वर्षांनी संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि कॅनडामध्ये कायमचे स्थायिक झाले. पाकिस्तानात जन्माला येऊनही तारिक नेहमी स्वत:ला भारताचे सुपुत्र म्हणत होते.

1977 मध्ये तारिक यांच्यावर बंदी

पाकिस्तानात राहत असताना तारेक फतेह यांनी कराची सन या वृत्तपत्रासाठी वार्तांकन सुरू केले. तेव्हापासूनच त्यांनी पाकिस्तान सरकारचे कारनामे उघड करण्यास सुरुवात केली होती. यामुळेच त्यांना एकदा तुरुंगातही जावे लागले होते. 1977 मध्ये तारिक फतेह यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

पाकिस्तानातील असून विरोधी लेखन

पाकिस्तानात जन्माला येऊनही तारिक फतेह यांनी पाकिस्तानच्या चुकीच्या धोरणांवर आणि कट्टरतेवर कडाडून टीका केली. भारत देश आणि हिंदू बांधवांबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आदर होता. हिंदू धर्म नेहमीच अनेक जाती व पंथ आणि धर्मामध्ये विभागला जात आहे. हे हिंदूंनी समजून घेतले पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते.