राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि अभिनयासाठी चर्चेत असतात. पण आज त्यांनी पुण्याच्या निमगाव दावडीत बैलगाडा घाटात घोड्यावर मांड ठोकली. २०१९ च्या निवडणुकीत कोल्हे यांनी भर सभेत निवडून आल्यानंतर घाटात बैलगाडा शर्यतीत घोडी पळवणार असल्याचं सांगितलं होतं. यावरून त्यांचे विरोधक आणि सेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं असं म्हटलं जातंय. मात्र आता माजी खासदार आढळराव पाटील यांनी हा दावा खोडून काढला आहे.

अमोल कोल्हे घोडीवर बसले मात्र ती घोडी नाटकातली घोडी होती असं आढळराव म्हणाले. अमोर कोल्हेंनी लोकांना शब्द दिला होता, की बैलगाडा शर्यत सुरू होईल तेव्हा मी घोडीवर बसेल. मात्र बैलगाडा शर्यत १६ डिसेंबर २०२१ ला बंदी उठली. ११ जानेवारीला शर्यती सुरू झाल्या. त्यावेळी आपण आव्हान केलं होतं. त्यावेळी मी आव्हान केलं होतं की, शब्द पुर्ण करायचा असेल तर त्यांनी लांडेवाडी किंवा नानवलीच्या यात्रेला यावं अन् घोडीवर बसावं. मात्र ते ११ नंतर थेट १६ ला आले आणि पहिल्या नाही, तर जत्रा सुरू झाल्यावर आले असं आढळराव म्हणाले.

अधिक वाचा  …आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? ; अजित पवारांचा खोचक टोला

बसले तर बसले पण ते घोडीवर बसल्यामुळे, घोडी मागे होती अन् बैल पुढे पळत होते. बैलगाडा तज्ञ आणि शेतकऱ्यांना हे माहितीये की, ती घोडी नाटक, तमाशा अन् चित्रपटात वापरली जाणारी घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं आढळराव म्हणाले. जसं नाटकात ते लोकाना बनवाबनवी करण्याचं काम ते करत आहेत असा आरोप आढळरावांनी केला.