पुणे: राज्यातील काही भागात 28 तारखेपर्यंत पाऊस घेणार विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला मिळणार दिलासा मिळणार आहे. मात्र, कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल.मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

अधिक वाचा  सरस्वतीच्या ठेकेदारांवर शाई फेकल्याचा एवढा तांडव होणार तर सावित्रीवर शेण फेकल्याचा बदला तिचेच लेक घेणार. - प्रविण गायकवाड

राज्यामध्ये जून ते जुलै या दोन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आता 34 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला असला तरी मध्य भारतात मात्र महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडल्याचे नोंदीवरून समोर येत आहे.

कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस

घाटमाथ्यावरील पावसामुळे पुणे येथे 24 तासांतील सरासरीच्या 519 टक्के, सांगली येथे 572 टक्के, तर सातारा येथे 716 टक्के पाऊस अतिरिक्त नोंदला गेला आहे. कोल्हापुरात सरासरीपेक्षा सर्वाधिक 993 टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर क्षेत्रामध्ये शुक्रवारी सकाळच्या नोंदीनुसार 24 तासांमध्ये 594 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस आत्तापर्यंतचा २४ तासांमधील सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी 1977 साली जुलै महिन्यात २४ तासांमध्ये 439 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.