वारजे माळवाडीच्या भागातून दोन मुख्य रस्ते जात असताना आणि विविध व्यावसायिक कंपन्याची वाहतूक सुरू असल्याने या भागात सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून या भागातील वाहतूक नियोजन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देण्याची मागणी विरोधी पक्षनेते दीपालीताई धुमाळ यांनी पुणे पोलीस वाहतूक विभाग यांच्याकडे केली आहे

वारजे वाहतूक विभागामध्ये अपु-या मनुष्यबळामुळे नंदिन व्यवस्थापन करणे अशक्य झाले असून वारजे भागात असलेली मुख्य चांदणी चौक वारजे हायवे चौक व शिवणे उत्तम नगर कोंढवे-धावडे या भागातील होणारी वाहतूक कोंडी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असल्याचे मत लेखी निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. वारजे वाहतूक पोलिसांवर सध्या प्रचंड ताण पडत असून किमान 60 कर्मचाऱ्यांची याठिकाणी आवश्यकता आहे. पुणे शहरातील इतर वाहतुक विभागाच्या क्षेत्रात एक पोलीस स्टेशन असताना देखील तेथील कर्मचान्यांची संख्या जास्त आहे. परंतु वारजे वाहतूक विभागाच्या अंतर्गत वारजे पोलीस स्टेशन आणि उत्तमनगर पोलीस स्टेशन असे 2 पोलीस स्टेशन असूनही कर्मचान्यांची संख्या खूपच कमी आहे.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

वारजे माळवाडीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या परिसरात शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंडे हे सुद्धा वारजे वाहतूक विभागामध्ये आले असून आता वारजे वाहतूक हद्द कोंढवे पावडे ते वनदेवी राजाराम पूल चांदणी चौक इतकी असून त्यानुसार येथे वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. परंतु वारजे वाहतूक पोलिसांचे संख्या केवळ 27 असून त्यांची संख्या किमान 60 पर्यंत असावी तरच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोयीस्कर होईल.

मुंबई बंगलोर महामार्ग आणि त्यावरून जाणारे VIP महामार्गावर वर पडणारे अपघात, बंद पडणारी वाहने, तातडीच्या ऍम्ब्युलन्स चांदणी चौकातील पुलाचे काम अशा अनेक समस्या आहेत. तसेच जास्त गर्दी होणारे क्षेत्र माई मंगेशकर चौक, शिंदे पूल, वारजे चौक, सहयाद्री शाळे समोरील चौक, वारजे माळवाडी बस स्टॉप, नवभारत हायस्कूलचा चौक अशी आहेत. वारजे चौक ते गणपती माधा हा अरुंद रस्ता आहे. आपण या बाबीकडे लक्ष देऊन वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी लेखी मागणी दीपाली प्रदीप धुमाळ पुणे पोलीस आयुक्त, पालकमंत्री अजित पवार व लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली आहे.