खडकवासला: खडकवासला मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची ही ‘दुघतीरग’ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असले तरीही विधानसभेत मात्र विविध प्रयोग करून अजित पवार यांना कायम पदरी पराभवाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता तर स्वतः धर्मपत्नी उमेदवार असतानाही खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये पारंपरिक विरोधक भाजप सोबत असतानाही फक्त ‘इव्हेंट बेस’ प्रचार फॉर्मुला राबविण्यात आल्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या पदरी काय पडणार याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. या मतदारसंघात पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधणी करताना काही घाईने निर्णय घेतले की ग्रामस्थ नेतृत्वाचा उशिरा आलेला होकार ग्राह्य धरल्याने मोठी गोची झाली की काय अशी शंका सध्या प्रचारामध्ये पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची संयुक्त सभा घेतल्यानंतर वारजेत सुरू झालेल्या चर्चांना शह देण्यासाठी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या संयुक्त सभेचे नियोजन करण्यात आले आहे परंतु त्याच मैदानावरती सभेचे नियोजन न करता बारटक्के रुग्णालय या कोपऱ्यातील जागेची निवड केल्यामुळे (65000च मताधिक्य देण्याचा एल्गार केलेल्या) विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही पवार कुटुंबियांचे टार्गेट खडकवासला विधानसभा मतदार संघ असल्याचे दिसते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिवसाला 4-4 सोसायटी सभा, कोपरा सभा, वैयक्तिक फोन, घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या प्रेमापोटी जमा झालेले असंख्य नेते ( फक्त उमेदवार सोबत आल्यानंतरच) जोमाने प्रचार करत आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या बारामती भागातील आणि खाजगी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या जीवावरती सध्या प्रचाराची धुरा असून घरोघरी पत्रके वाटण्यासाठी सुद्धा त्यांचाच वापर केला जात आहे. मुळात पारंपारिक विरोधक हे फक्त राज्य पातळीवरील अनोख्या युतीमुळे एकत्र चहापान करत आहेत गप्पागोष्टी करत आहेत परंतु खरा धोका प्रत्येकाच्या मनात आहे की पुणे महापालिका निवडणुकांच्यावेळी काय? विधानसभेत काय? आणि याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये सध्या खडकवासलाचा प्रचार रखडला आहे.

अधिक वाचा  पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र

राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपच्या ताब्यात गेलेला मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी जंग जंग पछाडत असताना आता भाजपाच्याच मदतीने बारामतीचा विजय साकारण्याचा प्रयत्न करत आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघांत भाजपाला सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ म्हणून भाजपच्या लेखी खडकवासल्याची वर्णी आहे तर बारामती हा सर्वाधिक मताधिक्य देणार अजित पवारांचा मतदारसंघ या दोन गोष्टींचा मेळ घालण्यासाठी सध्या खडकवासल्यात प्रचार उच्च पातळीवर गेला असल्याची चर्चा फक्त राजकीय पदाधिकारी करत आहेत. मतदारांचे मात्र …..कदाचित केंव्हाच ठरलं असेल!

खडकवासला मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची वाटचाल

खडकवासला विधानसभा मतदार संघात 2009 ला विकास दांगट, मनसेचे रमेश वांजळे आणि भाजपाचे स्थलांतरित मुरलीधर मोहोळ यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यावेळीही अजित पवारांच्या उमेदवाराला 22,518 मतांनी पराभव पाहावा लागला. त्यावेळीही शरद पवारांची वारजेमध्ये सभा आणि धनकवडी मध्ये अजित पवारांची बाईक रॅली झाली होती. रमेश वांजळेंच्या अकाली निधनानंतरच्या पोटनिवडणुकित विकास दांगट यांना डावलून हर्षदा वांजळे यांना सहानुभूती मिळेल या आशेवर राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने 27 आमदार (17 कॅबिनेट आणि राज्यमंत्री) खडकवासल्याच्या प्रचारात उतरवले होते. मात्र मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकत भिमराव तापकीर यांना विजयी केलं. राष्ट्रवादीने 2014 ला तिसऱ्यांदा 20वर्ष नगरसेवक आणि बाहुबली समजणाऱ्या दिलीप बराटे यांना उमेदवारी तरीही पक्षातील स्पर्धकांबरोबर योग्य समेळ न झाल्याने दारूणच पराभव स्वीकारावा लागला. खडकवासल्यात सलग 3वेळा झटका बसल्यावर चौथ्यांदा राष्ट्रवादी प्रचाराच्या रणनीतीत बदल करेल असे अपेक्षित असतानाही 2019ला अजितदादांचा हुकमी एक्का सचिन दोडके यांनाही 2 हजार 595 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीच्या 4ही उमेदवारांचा पराभव अन् स्वपक्षातील विरोध त्यांनी ऐन निवडणुकीत काय भूमिका घेतल्या हे वरिष्ठांना माहित होते परंतु 2019चा हा पराभव अजित पवारांच्या एव्हढा जिव्हारी लागला की त्यांनी तात्काळ विरोधीपक्ष नेतेपद काढून घेतले आणि आता त्यांच्याकडेच अजितदादांनी पुन्हा खडकवासल्याची जबाबदारी दिली.

अधिक वाचा  ओवैसींच्या ‘एमआयएम’ चा पुणे लोकसभा उमेदवार मतांच्या धुर्विकरणासाठीच; सईद आरकाटींची भुमिका

सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी देखील खडकवासल्यात प्रचाराची राळ उठवली आहे. एक प्रचाराची फेरी झालेली असताना देखील सुळे आणि रोहित पवारांकडून पदयात्रा, नागरिकांच्या गाठीभेटी सुरु आहेत. दर दिवसाआड याच विधानसभा मतदार संघात दोन्ही बाजूंचे मोठे नेते प्रचार करताना दिसत आहेत.