मॉडर्न विकास मंडळ, पुणे ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सलग ३४ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन उत्सव सभागृह, वनाज कंपनीसमोर, कोथरुड, पुणे ३८ येथे करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मा. प्रकाशजी जावडेकर (मा. वन व पर्यावरण, शिक्षण, माहिती व प्रसारण मंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक जयंत भावे, सौ. मंजुश्रीताई खर्डेकर, दिलीप उंबरकर, अजितदादा जगपताप अमोल डांगे, नंदकुमार गोसावी, संदीप नाना कुंबरे, दिपक पवार, गिरीष खत्री, अनुराधाताई येडके, अॅड. सौ. मिताली सावळेकर, दिनेश माझिरे, राज तांबोळी, कुलदीप सावळेकर, आर्कि. मंदार घाटे, कमलाकर भोंडे, गिरीश खत्री, दत्ता भगत, तुकाराम जाधव इ. मान्यवर उपस्थित होते. या शिबीरामध्ये १४७ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी मधुकर शिंदे मामा, दिलीप घोलप, बळीराम भडकवाड, योगेश मराठे, पांडुरंग शिंदे, आकाश मालपोटे, राजेंद्र शेठ, मंगेश सपकाळ, सुयश बुटाला, वसंत घाग, शुभम घोलप, रामचंद्र भगत, सचिन कुलकर्णी, सुयश ढवळे, भरत मराठे, शामराव कुलकर्णी, डॉ. सी.एम. जोशी, संजय भिमराव नाईक, सौ. रुपाली जहागिरदार, सौ. नीता घोलप, श्रीमती छाया फाटक, सौ. अनिता बांदीवडेकर, सौ. नूतन शेठ, सौ. वंदना काडगे, सौ. निता निपुणगे, सौ. प्रभा नाईक, सौ. निता घोलप, सौ. भावना मराठे, संजय पटेल, सौ. निर्मला रायरीकर, मनिष कदम यांनी सहकार्य केले. सर्व रक्तदात्याचे स्वागत सौ. मनीषा बुटाला व सुयश बुटाला यांनी केले. डॉ. संदीप बुटाला यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.