चीनमध्ये करोनाचे ६३ नवे रुग्ण अढळून आले आहेत. यापैकी दोन व्यक्ती या चीनमधीलच असून उर्वरीत ६१ जण हे परदेशातून चीनमध्ये दाखल झालेले आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गाची लाट परसण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एकाच दिवसात ६३ नवे रुग्ण अढळून आले आल्याने चीनची चिंता वाढली आहे. चीनमधील अनेक भागांमध्ये मागील दोन महिन्यापासून लागू करण्यात आलेले निर्बंध बुधवारपासून उठवण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर देशामधील कोरनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. करोनामुळे बुधवारी चीनमध्ये दोन जणांचा मत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मत्यू झालेल्यांची चीनमधील संख्या तीन हजार ३३५ इतकी झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८१ हजार ८६५ इतकी झाली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) गुरवारी जाहीर केलेल्या एका पत्रकामध्ये देशात ६३ नवे करोना रुग्ण अढळून आल्याची माहिती दिली आहे. परदेशातून चीनमध्ये दाखल झालेल्या ६१ नागरिकांचाही यामध्ये समावेश असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. चीनमध्ये नव्याने करोनाग्रस्त रुग्ण अढळून येण्याचे प्रमाण मागील काही आठवड्यांपासून अगदीच कमी झालं होतं. सोमवारी चीनमध्ये करोनाने एकही बळी गेला नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारीपासून चीनमधील करोना बाधित व मृतांचे आकडे वाढत गेले होते. साथीची परमोच्च अवस्था गाठली गेल्यानंतर ते कमी झाले पण मृतांचा आतापर्यंत आकडा शून्यावर आला नव्हता. मात्र आता देशामध्ये दोन आणि ६१ नवे रुग्ण अढळून आल्याने एकूण परदेशी रुग्णांची संख्या आता एक हजार ११४ झाली आहे.
करोना विषाणूसंदर्भात संशोधनामध्ये चीन आघाडीवर
जगभरामध्ये कोरनासंदर्भातील संशोधन सुरु आहे. मात्र यामध्ये चीन आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. येथे एकाच वेळी ६० हून अधिक ठिकाणी करोना विषाणूसंदर्भात संशोधन सुरु आहे. ब्रिटनमधील एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील ३९ देशामध्ये करोनावर लस शोधण्यासंदर्भातील काम सुरु आहे. चीन खालोखाल अमेरिकेमध्ये ४९ ठिकाणी संशोधन सुरु असून संशोधनाच्या बाबतीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब्रिटनमधील फिनबोल्ड डॉट कॉमने जगभरात करोनासंदर्भात सुरु असलेल्या संशोधनाच्या आधारावर रिसर्च इंडेक्स जाहीर केला आहे. यामध्ये जगभरातील कोणकोणत्या देशांमध्ये कशाप्रकारचे संशोधन सुरु आहे याचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालामध्ये चीन आणि अमेरिकेचे कौतुक करण्यात आलं असून दोन्ही देशांनी जगाला या संकटामधून वाचवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावल्याचे म्हटलं आहे. तसेच इतर देश संशोधनाच्या बाबतीत या दोन्ही देशांपेक्षा खूपच मागे असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिंदे राहिले त्या हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?; तीन दिवस ठाण सत्तेचा गैरवापर हे विरोधात तक्रार करणारं