कात्रज – “क्रांतीचे ढोल नवे, त्यास तुझे चर्म हवे, वांझोटे शब्द नको, रक्ताचे दान हवे” हे ब्रिद घेऊन अविरतपणे दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ॲक्टिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून रविवार 18 जून २०२३ रोजी, लिपाणे नगर, जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द या ठिकाणी करण्यात आले आहे. शिबीराचे आयोजन युवा सेना अधिकारी श्रीकांत मारुती लिपाणे आणि कपिल मारुती लिपाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील १७ वर्ष ॲक्टिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले असून यासाठी आधार ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे देणं लागतो ही भूमिका घेऊन सतरा वर्षांपूर्वी ॲक्टिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू केले. आपला वाढदिवस समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम म्हणून साजरा करण्याचा संकल्प करून तो सतरावर्षे अखंडपणे भव्य रक्तदान आणि विविध आरोग्य शिबिराने साजरा केला जातो. उन्हाळा आणि शाळा महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या यामुळे पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा काही रक्तपेढ्यात शिल्लक आहे. दरवर्षी जून महिन्यामध्ये रक्त साठा कमी होतो हा विचार करून समाजाला अत्यावश्यक असणारी गरज ओळखून भव्य रक्तदान हा उपक्रम राबविला जातो. ॲक्टिव्ह फाउंडेशनच्या आवाहनाला आंबेगाव – कात्रज व परिसरातील नागरिक आरोग्याचा सन्मान राखण्यासाठी मोठया उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात असे मत ॲक्टिव्ह फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मारुती लिपाणे यांनी मांडले.

अधिक वाचा  ‘कमेंट बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..’, विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन सुनावलं

यावेळी शिवसेना उपनेते तथा मा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, माजी नगरसेवक विकास नाना दांगट, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, भगवान खेडेकर, देविदास जाधव, दीपक गुजर, नाना कोंढरे, भाजपा अध्यक्ष अरुणभाऊ राजवाडे त्याचप्रमाणें विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला व नागरिकांसह युवक वर्गानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ११०० बाटल्याचे रक्त संकलन करण्यात आले. कार्यक्रमासाठी केदार शिंदे, लहू दगडे, राहुल पवार, अमित काकड, किशोर पवार, अभिजित पांडोळे, पंकज घडेकर, बाळा चव्हाण, प्रशांत पुजारी, महादेव डोहकळे आदींनी परिश्रम घेतले.