मणिपुर राज्य गेले अनेक महिने पेटले आहे, त्या संघर्षाने आता संतापजनक टोक गाठलं आहे . मणिपुर राज्य पेटत राहिल्या कारणाने समाजकंटकांची वृत्ती फोफावली आहे. त्याचीच परिणीती म्हणून आपल्या मणिपुरी भगिनींवर अन्वित अत्याचाराची फित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशाला समजली आणि मणिपूर घटनेचे गांभीर्य देशभरातील नागरिकांना समजले. ज्या पद्धतीने एका स्त्री ला अश्या पद्धतीने वागवलं जात असताना एक माणूस म्हणून शांत राहणं हा भारतीय संविधानाचा अपमान आहे.

संपूर्ण देशात एक संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने या घटनेवर व्यक्त होणं गरजेचं आहे . संविधाना अभिप्रेत असणारा नागरिक म्हणून आज पतित पावन संघटनेतर्फ लाल महाल येथे सदरील घटनेचा निषेध करत. मणिपूर लवकरात लवकर शांत करून दोषींना कडक शासन करावे अशी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे.

अधिक वाचा  पुण्यात अण्णा की भाऊ गुलाल कुणाचा? भाजपा आणि काँग्रेसची ही बलस्थाने