पनवेल : समाजातील नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण होऊन संविधानाने उच्चवर्णीय ते तळागाळातील पीडित, शोषित, वंचित अश्या सर्व प्रजासत्ताक भारताच्या जनतेला दिलेले संवैधानिक अधिकार त्याना माहीत व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन शेतकरी कामगार पक्ष, विचुंबे यांच्या विद्यमाने आदरणीय पुरुषोत्तम भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता पोलीस चौकी जवळ, विचुंबे, पनवेल येथे संविधान जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील हे सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, व्याख्याते मा. मनोज महाले हे आपल्या व्याखानाने उपस्थितांना मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर, नेते, समाजसेवक, विचारवंत ही सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा  AI फीचर्सचा Google Pixel 8a मैदानात सगळ्यांना बुचकळ्यात टाकले; एवढी किंमत तर ग्राहकांना ही सूट

सदर कार्यक्रम पुरुषोत्तम भोईर मित्र मंडळ, भिमरत्न फाउंडेशन, शिल्पकार सामाजिक संस्था, सारनाथ बुद्ध विहार, विचुंबे यांनी आयोजित केला असून विभागातील सर्वच ओबीसी, एस.सी., एस.टी., एन. टी. यांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मा. पुरुषोत्तम भोईर यांनी केले आहे.