रत्नागिरी येथील रिफायनरीच्या संदर्भात बारसू येथील जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरु केली आहे. या विरोधानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपांनी तापण्यास सुरुवात झाली आहे. याचवेळी आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.

उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन बारसूची जागा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवली नव्हती. तर ही जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच केंद्र सरकारकडे १२ जानेवारी २०२२ रोजी पत्राद्ववारे सुचवली होती.

अधिक वाचा  मुख्यमंत्री फडणवीसांच्या १०० दिवस आढावा 6 दिग्गज मंत्री फेल; उपमुख्यमंत्री शिंदेंची धक्कादायक कामगिरी

सामंत म्हणाले, बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पावरून सध्या आंदोलन सुरू आहे. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र दिलं होतं. ठाकरेंनीच या जागेचा पर्याय दिला होता. रिफायनरींसाठी उध्दव ठाकरेंनीच स्वत: सुचविलेल्या जागेचंच सर्वेक्षण सुरु आहे असल्याचंही सामंत यावेळी म्हणाले. तसेच ठाकरे गटाकडून फक्त मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसू सोलगावमध्ये मोठं आंदोलन होईल अशी अपेक्षा काही जणांना होती, फार मोठा उद्रेक होईल असे वाटले होते, मात्र त्यांचे मनसूबे धुळीला मिळाले. यामुळेच जालियनवाला बाग हत्याकांड बारसूत देखील होईल असं म्हटलं जात असल्याचं म्हणत सामंत यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

बारसू वासियांवर कोणतीही दडपशाही करण्यात येणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासन आंदोलकांवर समन्वय साधून असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रिफायनरी संदर्भात चर्चेद्वारेच मार्ग काढला जाईल असंही सामंत यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  सध्या काही लोकांना उद्योग नाहीत, ते उगाच वाद घालत बसतात; शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

बारसू सोलगावमध्ये मोठं आंदोलन होईल अशी अपेक्षा काही जणांना होती, फार मोठा उद्रेक होईल असे वाटले होते, मात्र त्यांचे मनसूबे धुळीला मिळाले असल्याचे टीका देखील सामंत यांनी केली आहे. तसेच आंदोलकांवर दडपशाही करणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासन आंदोलकांवर समन्वय साधून असल्याचे त्यांनी सांगितले.

मातोश्रीवर खासदारांची चर्चा सुरू

कालपासून रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोपही केला. त्यानंतर मातोश्रीवर सर्व ठाकरे गटाच्या खासदारांची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी येथील रिफायनरीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर बैठक होत असून बारसू येथील जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केल्यानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सरकारला सामूहिक हत्याकांड करायचे आहे असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत, विनायक राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांची बारसू आंदोलन प्रकरणी ही आढावा होती. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईच कमाई; मालवाहतूक 146 दशलक्ष टनांवर, असा झाला फायदा