अदानी समूहाचे चिनी नागरिकांशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. या संबंधांमुळे संपूर्ण देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. हा आरोप मॉरीस चँग नावाच्या व्यक्तीमुळे केला जात होता.या चँग यांनी दावा केला आहे की तो चिनी नसून तैवानचा नागरीक आहे. चँग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, तैवानचे अधिकृत नाव हे रिपब्लिक ऑफ चायना आहे आणि माझा पासपोर्ट हा रिपब्लिक ऑफ चायनाचा आहे, आपण ज्याला चीन म्हणून ओळखतो त्याचे अधिकृत नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आहे.

अधिक वाचा  बच्चू कडूंना ठाकरेंनी पैसा पुरवला, रवी राणांचा सर्वात मोठा आरोप, संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान!

चँग यांना अदानी समूहाशी असलेल्या संबंधाबाबत विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. चँग म्हणाले, ‘मी तैवान मधील एक प्रतिष्ठित उद्योगपती आहे आणि माझा उद्योग समूह जागतिक स्तरावर व्यापार, जहाज वाहतूक, पायाभूत सुविधा आणि शिप ब्रेकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. मी अदानी समूहाशी संबंधित वादाबाबत काही भाष्य करू इच्छित नाही कारण ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. काँग्रेसने अदानी समूहावर गंभीर आरोप केले असून अदानी यांचे एका चिनी नागरिकाशी संबंध असल्याचाही आरोप केला होता. हे संबंध सगळ्यांना माहिती असतानाही अदानी समूहाला देशात बंदरे आणि विमानतळ चालवण्याची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.