पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांची येथेच्छ खिल्ली उडवली होती. त्यांनी धंगेकर कोण आहेत? हु इज धंगेकर? असा सवाल केला होता. धंगेकर यांना ही टीका जिव्हारीही लागली होती. पण त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. कसब्यातील जनतेने धंगेकर यांच्या बाजूने कौल देताच आता कसब्यात बॅरन वॉर सुरू झालं आहे. या बॅनरमधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. थेट भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेरच हे बॅनर्स लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अधिक वाचा  पाच वर्षांपूर्वी मी चूक केली, माफी मागतो….शरद पवार कोणती चूक केली मान्य?

भाजपचे खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. गिरीश बापट यांचं हे मध्यवर्ती कार्यालय कसबा गणपतीसमोर समोर आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… असं उत्तर देण्यात आलं आहे. या बॅनर्सवर असा मजकूर लिहून चंद्रकांतदादा यांना जशास तसे उत्तर देण्यात आले असून चंद्रकांतदादांची खिल्लीही उडवण्यात आली आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले…
मी गेल्या दहा बारा दिवसांपासून ऐकतोय. धंगेकर विरुद्ध रासने. अरे हु इज धंगेकर?, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. एका विराट सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यालाच आता काँग्रेसने बॅनर्स लावून उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  अमिताभ बच्चन यांनी अयोध्येनंतर ‘या’ ठिकाणी विकत घेतली प्रॉपर्टी; किंमत ऐकूण बसेल धक्का

नियोजन कर, यशस्वी होशील
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी विजयी झाल्यानंतर आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. धंगेकर यांनी बापट यांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बापट यांनी नियोजन कर आणि त्यानुसार काम कर. तू यशस्वी होशील. काही अडचण आली तर माझ्याकडे ये. मी तुला सल्ला देईन, असं बापट यांनी म्हटल्याचं धंगेकर यांनी सांगितलं. गिरीश बापट यांना मी निवडणुकीत भेटणार होतो. पण त्यांच्याविषयी संशयाची पाल चुकचुकायला नको म्हणून त्यांना भेटलो नाही. आता निवडणूक संपल्यानंतर त्यांची भेट घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं.