पुणे : पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांना सण, उत्सवाबरोबरच बंदोबस्त आणि गंभीर गुन्ह्यांमुळे वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचं समोर आल्याने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ वरून ८ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या कर्तव्यावर आणि आरोग्यावरही याता परिणाम होत आहे. ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पोलिसांची नोकरी म्हणजे त्याला वेळेचं बंधन नाही. अनेकदा बंदोबस्त, सण-उत्सव यांच्यावेळेस पोलिसांना घड्याळाकडे न पाहाता आपलं कर्तव्य बजावावं लागतं. ज्यादा तास काम करण्याचा पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौंटुबिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात महिला पोलिसांना तर ज्यादा तास काम करावं लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी यतास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुणे ग्रामीण दलात कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे साडेतीनशे महिला पोलिसांना लाभ होणार आहे.

अधिक वाचा  ठाकरे सरकारच्या सत्तेतील 2 वर्षांत भाजपा ने काय केले अन काय मिळवलं?

आजपासून निर्णयाची अंमलबजावणी

याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला पोलिसांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करत त्यांना 12 तासांऐवजी 8 तास कर्तव्य बजावण्यास सांगावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पुरूष पोलिसांची ड्युटीही ८ तास करणार – डॉ. अभिनव देशमुख यांचे संकेत

पुणे ग्रामीण पोलीस दलातल्या महिला पोलीस अंमलदारांना आजपासून ८ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. या निर्णयाचं सर्व महिला पोलिसांनी स्वागत केलं आहे. प्रयोगिक तत्वावर हा महिला पोलिसांची ड्युटी कमी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुरूष पोलिसांची ड्युटीही ८ तासांची करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.