मुंबई: राज्यात एकिकडे शिंदे सरकारच्या गतिमान सरकारच्या जाहिरातीवरून सर्वत्र टीका होत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या आणखी एका जाहिरातीवरून अजित दादांनी सरकारची चांगलीच कानउघडणी केली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारने प्रकाशित केलेली एक जाहिरात दाखवली. १७ कोटीहून अधिक रक्कम शासकीय जाहिरातींसाठी खर्च झाली. पण त्यावरील एसटी बसचा फोटो काचा फुटलेला आहे. तो फोटो अजितदादांनी सभागृहात दाखवला. अन् ही कसली दळभद्री जाहिरात, असा सवाल केला. तसेच ज्या एसटी बसवर सरकारची जाहिरात आहे, त्याची किती दयनीय अवस्था आहे, हेदेखील अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार उत्तर दिलं. प्रत्युत्तरादाखल त्यांनी मविआ काळातील एका जाहिरातीचा उल्लेख केला. विधानसभेतील ही खुमासदार प्रश्न-उत्तरं आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

अधिक वाचा  ‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया

अजित दादा काय म्हणाले?
विधानसभेत अजित पवार म्हणाले, ‘ शासनाने १७ कोटीहून अधिक रक्कम महानगर पालिकेच्या जाहिरातीत खर्च केली…. अजितदादांनी सभागृहात जाहिरात वाचून दाखवली… वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार… आणि इतकी दळभद्री बस आहे. काचा फुटलेली.. अरे कशाला हे धंदे करतात…असा सवाल अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर
अजित दादांच्या जाहिरातींच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं. या आधी एकच जाहिरात होती. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच होती. आता माझा महाराष्ट्र, गतिमान महाराष्ट्र, असं आमचं ब्रीदवाक्य आहे.

अधिक वाचा  फक्त ‘या’ ॲपमुळे पहलगाममध्ये दहशतवादी पर्यटकांपर्यंत पोहोचू शकले, अन्यथा..

कोट्यवधींच्या जाहिराती, बसची अवस्था दयनीय
सरकारची प्रसिद्धी करणाऱ्या जाहिराती राज्यभरातील विविध एसटी बसवर लावण्यात आल्या आहेत. मात्र एसटी बसमधील आसन व्यवस्था आणि इतर सुविधांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. यावरून जनतेतूनही सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारच्या विविध निर्णयांची माहिती होण्यासाठी या जाहिराती बसेसवर छापण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील दुरवस्था गंभीर आणि बोलकी असल्याचं चित्र आहे.

‘मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्यावरही खुमासदार टीका केली. मी तुम्हाला देशद्रोही म्हणालोच नाही. नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप आहे. दाऊदशी संबंधित लोकांशी त्यांनी व्यवहार केला. त्यामुळे त्यांच्यासाठी देशद्रोह शब्द वापरला. त्यांना पाठिशी घालणारे, असा आरोप मी केला. तुम्ही आम्हाला महाराष्ट्र द्रोही, घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्ष नेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

अधिक वाचा  हातात AK-47, पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर