नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती” असं म्हटलं आहे.

अधिक वाचा  बिंधुमाधव ठाकरे दवाखान्यात मयत पास केंद्र सूरू करा- मनसे

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ‘कुठे आहे लस?’ असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला आहे. “देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती” अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला. व्हिडिओमध्ये भारतातील लसीकरणाच्या आकड्यांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. याचा उद्देश कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत दोन्ही डोस देऊन 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे असं म्हटलं आहे.

अधिक वाचा  परदेशात नोकरीचे आमिष : वादग्रस्त पंच किरण गोसावीला अटक

रोज 93 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची गरज आहे. पण गेल्या सात दिवसांचा लसीकरणाचा सरासरी आकडा हा दिवसाला 36 लाख इतका आहे. यामुळे गेल्या सात दिवसांत 56 लाख डोसचा फरक आहे. 24 जुलैला गेल्या 24 तासांत 23 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. यात 69 लाखांचा फरक होता, असं व्हिडिओत म्हटलं आहे. काँग्रेसने मंदावलेली लसीकरण मोहीम आणि सरकारच्या लसीकरण धोरणावर जोरदार टीका केली आहे. तसेच पेगासस स्पायवेअर म्हणजे हेरगिरीवरून ही राहुल गांधींनी ट्वीट केलं आहे. “मित्रांचा फायदा आणि विरोधकांची हेरगिरी” असं देखील राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.