पुणे – काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीने कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक एकत्र निवडणूक लढवून भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो हे दाखवून दिले. ही आघाडी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत कायम राहिली तर भाजपच्या ९९ नगरसेवकांपैकी ५७ जण धोक्यात येऊ शकतात असे आकडेवारी वरून समोर आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आघाडी राहणार की नाही यावर महापालिकेतील सत्ताधारी ठरणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या २८ वर्षापासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाल्याने हा मतदारसंघ सुरक्षीत मानला जात होता. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यात २०१९ मध्ये स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपचे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कसब्याकडे सर्वांच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतांची फाटाफूट न होता भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला.

अधिक वाचा  कांदा निर्यातबंदी केंद्रानं खरंच उठवली की फक्त निवडणूक जुमला? केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे हे प्रसिद्धीपत्रक

२०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यामध्ये १६२ पैकी ९९ नगरसेवक भाजपचे निवडून गेले. या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. गेल्या एका वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका कधी होणार हे स्पष्ट झालेले नसले तरी कसब्याच्या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपचे डोळे उघडणारा ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता हवी असेल तर किमान ८७ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजपकडून यापूर्वी११० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

फटका असा बसेल

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी कायम ठेवली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. चारचा प्रभाग झाला तर त्यांचे ९९ पैकी ५७ नगरसेवक धोक्यात येऊ शकतात. तर ४२ नगरसेवकांना या आघाडीचा कोणताही फरक पडणार नाही., तेथे भाजपची ताकद जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, आघाडीतील कुरबुरी, जागा वाटपातील वाद, त्यातून होणारी बंडखोरी, स्थानिक समीकरणे, नातीगोती, उमेदवाराची प्रतिमा हे मुद्देही लक्षात घेऊन काही प्रभागात भाजपला दिलासाही मिळू शकतो. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून कोणत्या कोणत्या प्रभागात फटका बसू शकते हे स्पष्ट होत आहे.

अधिक वाचा  अण्णा बनसोडेंच्या लेकीच्या लग्नात अजित पवार-संजोग वाघेरे समोरा-समोर तर वाघेरे थेट पाया पडले

मविआमुळे धोक्यातील भाजपचे प्रभाग (अडचणीत असलेल्या नगसेवकांची संख्या)

प्रभाग क्रमांक १ धानोरी कळस (३)

प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमनाथनगर (४)

प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर (३)

प्रभाग क्रमांक ७ पुणे विद्यापीठ वाकडेवाडी (४)

प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी (४)

प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी (२)

प्रभाग क्रमांक १० बावधन खु. कोथरूड डेपो (२)

प्रभाग क्रमांक ११ रामबाग – शिवतीर्थ नगर ( १)

प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना (४)

प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ (१)

प्रभाग क्रमांक १७ रस्ता पेठ रविवार पेठ (१)

प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ – फुले पेठ (३)

अधिक वाचा  शिंदे सेनेला शरद पवारांचा धक्का, करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी

प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर कासेवाडी (१)

प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क घोरपडी (१)

प्रभाग क्रमांक २३ हडपसर सातववाडी (२)

प्रभाग क्रमांक २५ वानवडी (२)

प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी कौसरबाग (१)

प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ पर्वती (२)

प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत दत्तवाडी (३)

प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर (३)

प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी (१)

प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर पद्मावती (१)

प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड इंदिरानगर (१)

प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुपर इंदिरानगर (१)

प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर (२)

प्रभाग क्रमांक ३९ आंबेगाव कात्रज गावठाण (१)

प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी (३)

या भागात दिलासा

नागपूरचाळ फुलेनगर, बावधन कोथरूड डेपो, डहाणूकर कॉलनी, एरंडवणा,शनिवार पेठ, सदाशिव पेठ, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, इंदिरानगर या भागातील भाजपला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तेथे महाविकास आघाडीचा प्रभाव कमी असल्याचे २०१७ च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.