पुणे : मागच्या काही काळात राज्य आणि देशात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मात्र, बलात्कारासारखी गंभीर घटना घडल्यानंतर महिलांचं आयुष्य बदलून जातं. अनेक महिला स्वतःच अपराधीपणाची भावना घेऊन दबावात जगत राहतात. अशा महिलांच्या मनातली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी ‘सहयोग ट्रस्ट’तर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्यात आलं आहे.

दुःख आणि समस्या सांगण्यासाठी ‘सपोर्ट ग्रुप’

बलात्कारासह जगणाऱ्यां महिलांना त्यांचे दुःख आणि समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालवण्यात येणार आहे. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झालेले असतात अशा महिला जणू काही ती स्वतःचीच चूक आहे असा दबाव घेऊन आयुष्यभर जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातला ताणतणाव एकमेकांसोबत संवादातून कमी करण्याचा प्रयत्न हा ‘सपोर्ट ग्रु’प करणार आहे. यासोबतच बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि त्यांच्या मुलं आणि परिवारासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचं कामंही या संस्थेतर्फे केलं जाणार आहे.

अधिक वाचा  अमोल कोल्हे ट्रोल, पुणे प्रशासनावर केली टीका

बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातली नकारात्मकता बदलणार

‘मायग्रोथ झोन’ ही कंपनी ‘न्युरोलिंग्विस्टीक’ तंत्रज्ञानावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तींच्या माध्यमातून बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत केली जाणार आहे. ‘मायग्रोथ झोन’सोबत ‘सहयोग ट्रस्ट’ सहकार्याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले, आपलीच चूक झाली अशी स्वतःलाच दोष देणारी भावना, मनातली भीती, राग यासंदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे.

इथे साधा संपर्क :

रेप क्रायसिस सेंटरसाठी, असीम सरोदे आणि असोसिएट्स, फ्लॅट क्रमांक 5, प्रथमेश सीएचएस, लेन क्रमांक 5, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना, पुणे या पत्त्यावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच sjadhav82@gmail.com हा ई-मेल आयडी किंवा 020-25459777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 32 हजार 559 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. या आकडेवारीनुसार दिवसाला देशात सरासरी 82 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. राज्यात 2019 मध्ये 2299 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.

‘लग्नाच्या अमिषाशिवाय शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नाही’

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय दिलाय. एका खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच यासाठी तरुणाला दोषी धरता येणार नाही हेही नमूद केलं. यवतमाळ सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपी तरुणाला दोषी मानत 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तीही उच्च न्यायालयाने रद्द केली.

अधिक वाचा  प्रियांका चतुर्वेदी यांनी निलंबनाच्या निषेधार्थ सोडले अँकरिंग

एका तरुणीने 6 ऑक्टोबर 2006 मध्ये आरोपी तरुणावर यवतमाळमधील घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपी तरुणाने तिला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती झाली. गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला, असा आरोप करण्यात आला.