महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पासून रखडत गेलेली पालकमंत्री यादी आज जाहीर करण्यात आली असली तरी यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ‘सुपरमॅन’ची ताकद कायम ठेवत अन्य राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

असे असणार पालकमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर

सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया

चंद्रकांतदादा पाटील- पुणे

विजयकुमार गावित- नंदुरबार

अधिक वाचा  मोदींनी नूर बदलला राहुल गांधींवर निशाणा; जाहीर प्रचारात पाकिस्तानची एन्ट्री! ‘काँग्रेसला तीन आव्हाने दिली’

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) रवींद्र चव्हाण- पालघर सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली

दीपक केसरकर -मुंबई शहर कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा,ठाणे

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

दरम्यान, सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावरूनही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज अखेर यावर शिंदे सरकारने पालमंत्र्यांची नावे जाहीर करून हा तिढा सोडवला आहे.

अधिक वाचा  उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

जाहीर करण्यात आलेल्या पालमंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असणार आहे.