नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध करून दाखवलं.त्यामुळे शिंदे सरकार आता राज्यात स्थापन झालं आहे. राज्यात आता सत्तांतर झाल्याचे परिणाम अहमदनगर जिल्ह्यावरही होणार आहेत. जिल्हावार वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात आपले वर्चस्वरावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच आमने-सामने असतात. तर रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजपचे नेते राम शिंदे यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यामधील संघर्ष तीव्र होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकासाच्या कामात अडथळे आणले तर खपून घेणार नाही, असा इशाराच आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अन्नसुरचना योजनेअंतर्गत शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाच्या वेळेस ते बोलत होते.

अधिक वाचा  ‘सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय’; पंतप्रधान मोदी

कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकारणास आता वेगळं वळण आलं आहे. यानंतर आता तालुक्याला आणखी एक आमदार मिळाला हे चांगलं आहे. मात्र विकास कामांमध्ये अडथळे आणले तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कर्जत जामखेडचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात येणाऱ्या शहाकाशाचं राजकारण होणार यात शंका नाही.

यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष होता मात्र त्यामध्ये मागील निवडणुकीत पवार घराण्याची एंट्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये रोहित पवार यांच्या रूपाने झाली. त्या निवडणुकीत रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांच्या या दमदार एंट्रीमुळे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा वर्चस्व वाढू लागले आहे, तसा प्रभावही मागच्या अडीच वर्षांमध्ये दिसलाय. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी आमदार राम शिंदे यांना मंत्रिपद दिले जाते का हे पाहावं लागेल.