पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला शह देत सत्ता मिळावली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत व्यक्तीगत लक्ष देत होते. सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी पुन्हा महापालिकांमध्ये सत्ता मिळवणार अशी सुरू होती. मात्र आता राज्यात सत्तांतर झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचा चार्ज घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

राज्यात महाविकास विकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत मिळवून सरकार स्थापन केलं. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन मुळशी धरणातून पाणी आणण्यास कटिबद्ध: मुरलीधर मोहोळ

दरम्यान देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरला गेले होते.तिथे त्यांचं जल्लोषात स्वागत झाल. आता ते आपल्या कामाला लागणार असून पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे ते आढावा घेणार आहे. पुणे महापालिकेवर सध्या प्रशासन आहे. आगाामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची पुणे भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

प्रभाग रचना कळीचा मुद्दा

आधीच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना बदलून चार ऐवजी तीनचा प्रभाग केला होता. मात्र ही प्रभाग रचना भाजपसाठी अडचणीची असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे पुणे दौऱ्यात फडणवीसांसमोर स्थानिक नेत्यांकडून प्रभाग रचनेसंदर्भातील अडचणी मांडल्या जावू शकतात.