मुंबई : कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना मला अँजिओग्राफी करण्याचा आग्रह धरला होता. मी त्यांना तसं काही करण्याची गरज वाटत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अँजिओग्राफीला होकार देऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. माझी परिस्थिती खराब असतानाही मला अटक करण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजता दोनशे पोलिस आले होते, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना केला.

आमदार राणे म्हणाले की, कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना मला अँजिओग्राफी करण्याचा गरज आहे, असे सांगण्यात आले होते. मी म्हटले की, मला तसं काही वाटत नाही. माझा बीपी, शुगर लेव्हल कमी होती. तरीही मला सर्व गोष्टी कळत होत्या. त्यातील काही लोक आमच्याही ओळखीचे होते. सगळेच सरकारच्या बाजूचे नसतात. एका पोलिस कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की, ‘राणेसाहेब अँजिओग्राफी करू नका. त्यानिमित्ताने शरीरात इंक टाकावी लागते. ती इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे तुम्ही अँजिओग्राफीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होकार देऊ नका.’ हा प्रकार माझ्यावर कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला आहे.

अधिक वाचा  ‘तारक मेहता का..’ मधील सोढीचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती, पोलिसांचा तपास सुरू

माझा बीपी, शुगर लेव्हल कमी होती. तरीही रात्री अडीच वाजता दोनशे पोलिस माझा डिस्चार्ज करण्यासाठी पाठविण्यात आले होते. आताच्या आता राणेंचा डिस्चार्ज करा. त्यांना अटक करा आणि जेलमध्ये पाठवा. पोलिसांनी माझी अवस्था पाहिल्यानंतर ते बाहेर गेले. माझी परिस्थिती खराब असतानाही अटक करण्यासाठी पोलिसांवर वारंवार दबाव येत होता. मुंबईतून ते फोन येत होते. नीतेश राणे यांना कुठल्याही परिस्थिती डिस्चार्ज करा, आम्हाला त्यांना अटक करायची आहे, असा दबाव पोलिसांवर होता, असेही नीतेश राणे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

राणे म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांना सभागृहातच येऊ द्यायचं नाही. त्यांना जिवंत ठेवायचे नाही. असा प्रकार आपल्या राज्यात सुरु आहे. नुसतं षडयंत्रच रचायचं नाही, तर चुकीचं इंजेक्शन, त्यांच्या शरीरात चुकीची औषधे सोडायची आणि त्यांना कायमस्वरुपी संपवून टाकायचे, याला म्हणतात ठाकरे सरकार. या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला. तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी फिरत होता आणि माझ्यावर ३६० चा गुन्हा दाखल झाला होता.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार? नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात सभा घेण्याची शक्यता

या राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण, बाहेरी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे. त्यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. मुंबई पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. मुंबई पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्ट घेण्याचीच कामे रहिली आहेत. अधिकाऱ्यांना विचारले तर ते म्हणतात की वरून आदेश आले आहे. नेमके वरून आदेश येतात तरी कुठून, असा आम्हाला प्रश्न पडतो, असा सवालही राणेंनी सभागृहात उपस्थित केला.

माझ्याकडेही पेन ड्राईव्ह आहे

अधिक वाचा  महायुतीत ‘नाशिक’चा ट्विस्ट सुरुच! भुजबळांची भूमिका वेगळी आमची ताकद; वेगळी गोडसेंची पुन्हा वाढली चिंता

दिशा सालियनची आत्महत्या असेल, तर मग सीसीटीव्ही का गायब केले. वॉचमन गायब, वहिची पाने गायब. रोहन रॉय गायब आहे..दिशाची आत्महत्या नाही हत्याच आहे. माझ्याकडे त्याबाबतचा पेन ड्राईव्ह आहे, तो मी न्यायालयात देणार आहे. माझ्याकडे पुरावा आहे. आम्ही सिद्ध करू शकतो की 8 तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या ठिकाणी होता, असा आरोप राणे यांनी पुन्हा केला.