मुंबई : कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण केलं जाणं गरजेचं आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर सध्या केला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेकडून हरियाणामध्ये अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टनेलला फुमिगेशन टनेल असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा याच उपयोग केला जात आहे.
डब्ल्यूएचओ अर्थात WHO च्या व्यवसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने या टनेलची निर्मिती केली आहे. यामध्ये पाण्यात १% सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेल मधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ४ ते ५ सेकंदाचा वेळ लागतो. ज्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी १२ फुट लांबीच्या पोर्टा केबीनचा वापर केला गेला आहे.
नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्यांचे अधिक चांगलं वितरण सुनिश्चित करण्यासाठी फ्लूड फ्लो सिस्टम अँनसिस(ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन आणि सिम्युलेट केले गेले आहे. द्रवपदार्थ प्रमाणे दोन फ्लूड प्रणालीच्या पद्धतीचा वापर येथे केला आहे. डिस्क्रिट पार्टिक्युलेट मॉडेल (डीपीएम) चा उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ कसा सर्व ठीकाणी कसा पोचला जाईल हे बघितलं आहे. मानवी शरीरावर याचा प्रत्यक्षात काही विपरीत परिणाम होतो आहे का नाही याचा शोध घेण्यासाठी हि पद्धत वापरली जात आहे.
अशा प्रकारे कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जाणे शक्य होईल, पण ज्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे, त्यांनी मात्र यामध्ये प्रवेशास करणे योग्य राहणार नाही असंही सामंत यांनी सांगितलं

अधिक वाचा  महाराष्ट्रात मान्सूनचे धुमशान; पुण्यात रेड अलर्ट या शाळांना सुट्टी पण मुख्याध्यापकांसह इतरांना ‘ही’ ड्युटी